बार्टी व ड्रिमलँड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त उपक्रम.
वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दीन हा विद्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येतो. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर, 2017 रोजी घेतला होता तेव्हा पासून हा साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुसंघाने बार्टी व ड्रिमलँड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये वेदांत तानाजी देवगिरीकर प्रथम आला आहे. बार्टी व ड्रिमलँड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी प्रथम वेदांत तानाजी देवगिरीकर, द्वितीय काव्यांजली दीपक कोडीतकर, तृतीय साई रामदास पवार यांनी क्रमांक पटकावला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक स्वाती शेंडकर, रंजना देवगिरीकर, हर्षदा देशपांडे, अश्विनी गायकवाड, स्वाती फणसे, सचिन कांबळे उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

