वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
पुणे,दि.७ नोव्हें:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणेच्या वतीने ७ नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.
७ नोव्हेंबर रोजी बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शितल बंडकर यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होते. सदर प्रश्नमंजुषा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनावर आधारित प्रश्न विचारले गेले. याप्रश्न मंजुषा स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या वंचित बहुजन आघाडीच्या उपसचिव सारीका फडतरे. विजेता ठरलेल्या सारिका फडतरे यांचं यावेळी अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रम शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावून हा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शितल बंडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात बार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. आणि नागरिकांनी या सर्व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

