मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
सिडको:- सातपूर अंबड लिंकरोडवर संजीवनगर भागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वादातून एकाने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहील शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्य्क निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, संदीप पवार यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ व पथक घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाबाबत तपास सुरु आहे. मात्र, ज्यांनी गोळीबार केला तो फरार असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. संजीव नगर परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
