पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस अधिकारी च अंमलदार हे परिमंडळ-१ व २ मधील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १०/११/२०२२ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार यांना बातमीदारा मार्फत मिळाल्याचे अनुशंगाने १) फरासखाना पोलीस ठाणे हद्दीत क्रांती चौक मरगी गल्ली, बुधवार पेठ, पुणे सार्वजनिक रोडवर इसम नामे जाहिदुल मोतेहर मलीक ऊर्फ आकाश मंडल, वय २४, रा. भोई गल्ली, बुधवार पेठ, पुणे याचे ताब्यात ७६,०००/- कि.च्या ३८ ग्रॅम मॅस्केलाईन या अंमली पदार्थाच्या ३८ गोळया, १०,०००/- किंवा एक रीअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ८६,०००/- रु किया ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे..त्याचेविरुध्द फरासखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २१४/२०२२. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २२ ( ब ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण, अंमली पदार्थ विरोधी पथक -२ हे करीत आहेत. तसेच २) बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत पुणे स्टेशन रेल्वे आऊट गेट क्र.२ व ३ चे मधोमध सार्वजनिकठिकाणी मोपेडवरुन दोन इसम नावे १) अलफहाद वजीर सय्यद, वय-२७ वर्ष, रा. घर नं. ४६८, सेन्ट्रल स्ट्रिट, कॅम्प, पुणे व त्याचेमागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव २ ) शहारुख बाबु शेख, वय-२९ वर्ष. रा. सनश्री क्राऊन, एन. आय.बी.एम.रोड, कोंढवा, पुणे यांचे ताब्यात २,००,०००/- रु किचे १० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ ४०,०००/- रु किंची लाल रंगाची एव्हीएटर मोपेड २०,०००/- रु किचे दोन मोबाईल असा एकुण २.६०,०००/- रु किचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचेविरुध्द बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २७८/२०२२. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क). २२ (ब). २९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक, गावडे, बेडगार्डन पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा.सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार, नितीन जगदाळे, साहिल शेख आझीम शेख, संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, योगेश मांढरे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.