2021 मध्ये उध्दव ठाकरे यांचा हस्ते मिळाला सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे.येथे दि. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील कृषी मीत्र हे आपल्या शेतात चन्ना पेरण्यासाठी आपली स्वताची बैल जोडी सोबत वखर घेऊन शेतीची मशागत करत होते. तेवढ्यात एक रानड्डकराचा कळप अचानक धावत देवराव शेडमाके यांच्या शेतात आला सदर शेतकरी हा आपल्या शेतीच्या कामात मग्ण असल्यामुळे त्यांच त्या रानड्डकरांकडे लक्ष नव्हतं व काही क्षणातच त्या कळपातील रानडुकराने त्यांच्या एका बैलावर हल्ला केला यात बैलाचा मागचा पायाची नस तुटल्याने बैल निकामी झाला असून शेतकरी थोडक्यात वाचला यात सदर शेतकरी हवालदिल झाला आहे. समोर पेरणी आणी वेळेवर बैल निकामी शेतकरी शेडमाके यांनी सदर माहिती वनरक्षक ठाकरे साहेब यांना फोन द्वारा दीली लगेच वनरक्षक ठाकरे यांनी राउंड ऑफिसरं गेडाम यांच्या सोबतीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
नंतर बैलाच्या पायाची नस तूटल्याने बैलाच्या पायाच ऑपरेशन करने गरजेचे होते त्या मुळे पशू वैध्दकीय अधीकारी गोंडपिपरी येथील डॉ. पराग खोब्रागडे यांना ही माहीती देण्यात आली सदर माहिती प्राप्त होताच डॉ. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ठाकरे, डॉ. लांबाडे, डॉ. बडगेवार यांनी अतीशय परीश्रम घेऊन त्या बैलाच्या पायाच ऑपरेशन केल. बैल सध्यास्थीत कामात लागणार नाही पण माझ्या डोळ्यासमोर मला माझा बैल दीसत राहील यातच मला आनंद आहे असे बोलून शेतकरी शेडमाके यांनी सदर अधिकारी यांचे समोर आपली भावना व्यक्त केली आहे व रानड्डकराच्या हल्यात जखमी झालेल्या माझ्या बैलाची मला वन विभाग यांनी त्वरित माझ्या हाकेला धावून मला आर्थिक मदत मिळवुन द्यावी अशी नम्र विनंती कृषी मीत्र देवराव शेडमाके यांनी वन विभाग यांना केली आहे.