Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

“बाप” (मराठी कविता)

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 12, 2022
in Uncategorized, मनोरंजन, महाराष्ट्र
0 0
0
“बाप” (मराठी कविता)
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विद्रोही कवी:- गिरीश मु. जाधव रा. पुणे
मोबाईल नंबर ८३९०८७३४७९

माझी बाप नावाची कविता संबंध या देशातील ज्या ज्या शेतकरयांनी सावकराच्या कर्जाला वैतागुनं आत्महत्या केली. त्या सबंद शेतकऱ्याना माझी ही बाप नावाची कविता मी नम्र पूर्वक अर्पनं करीत आहे.

बाप काटयाकुटयात दिसायचा,
घामाघुम देह त्याचा शिवारात कष्ट उपसायचा
कधी विहिरीतुन तो पाणी उपसायचा,
चरटया सोबतं हाताला रक्त भरभटयाचं
विहिरीचं पाणी माञ गोड असायचं
बापाच्या हाताचा गोडवा पाण्यात उतरायचा..

पौरं सौर पाणी प्यावुनं तृप्त व्हायचे
बापाच्या अंगा खांदयावर उडया घेयचे
बाप म्हणायचा लाड पुरा झाला
पुस्तके उगडा अभ्यास करा,
बाबासाहेब व्हा, सुटा बुटात रहा,
उगा नको म्या सारकं ग्यानं,
मातीत शेणं खातयं ?

मग आई न्याहरी साठी आवाज देयची
मुलं आनंदी व्हायचे, पटापटं पुस्तके दप्तरात
भरायचे, हात पाय दुवित आई समोर, बसायचे
मग या मुला, मुलींचा बाप यायचा शर्ट कुटिला
टांगायचा, हात पाय धुवायचा
कोपरी, पयजाम्यावर त्यांच्या सोबत
पंक्तीला बसायचा, वांगयाची भाजी भाजरीची
भाकर, लोणचं, पापड, चटणी,
आई मुलांची ताटं भरायची..
मग बाप, हा घास चिऊचा, हा घास खाऊचा अस करीत मुलांना भरवायचा
…

बापाच्या डोळयात,
आनंद अश्रु घर करायचे, मुलं-मुली मोठं होतं चालले म्हणुनं बाप चिंता करायचा,
शेतात काब्बाड कष्ट करूण, सुध्दा बापाला
जस पाहिजे, तस पिकं भेटतचं नव्हतं
…

म्हणुनं बाप मात्र, आई समोर ढसा ढसा रडायचा,
आई, बापला धिर ध्यायची, पण बाप मात्र ओक्सा बोक्शी व्हायचा..

सावकाराचं कर्ज, सोसायटयाचं कर्ज पेडत, पेडत बापचं कमबरडं मोडलं होतं..
तरी कर्ज माञ पिटत नव्हतं, व्याजावर, व्याज
चक्री वैज,
बाप माञ व्याजतचं अडकतं गेला जन्मभर..

मुलं, लहान एकटया बापावरचं सगळं काय होतं
पाच ऐकर महार वतनी बापाच्या नावा वर होती
बागायत जिरायित सारी कशी एक होती

दोनं बैला सोबतं बाप शेतात रांधायचा
भुईमुगं, डाळी, साळी, कांदा, भाजरी, ज्वार,
पिक. पाणी वर्षाला काढायचा..

कधी गावात ओला दृष्काळ,
कधी गावात सुक्का दृष्काळ,

नास झालेले पिक पाणी रस्त्या वर पडायचे,
बाप नासलेल्या पिका वरुन मायेचा हात फिरवायचा,
हेच पिकं सावकराच्या कर्जातुन बापाला सुटका देणारं होतं
पण आता तेचं, पिक रस्त्या वर मरून पडलय
म्हणुन बाप डोक्यावर मारीत, मारीत,
भितिवर डोकं आपटायचा ,
आई पण बापा सोबत रडायची, कर्ज मात्र वाढत जायच.

मुला बाळांच्या जेवणाची हालं लयं व्हायची
बाप म्हणयाचा, हे मुलांनो तुम्ही शाळा सोडुं नका हा,
माझ्या सारक तुमचं ग्यानं मातीत नको हा जायला
मी तुमच्या साठी रोजांदारी वर पण जाईलं
पण तुम्ही शिका, सवरा, बाबासाहेब व्हा,
सुटा बुटात रहा,

मी काय कष्टाला डरतोय का काय
आरे मी वाघ हाय,
माझ्या डरकाळीनं या शेतातील पिकं पाणी सळासळा कापतयं
तापलेली धरणी, जागेवर शांत होतीय,झाड झुडपे गप घार उभी राहातात, अरे उडणारा पाळा पासोरा एका जागेवर मला घाबरून स्तबंद उभा राहतोय,
ये पोरांनो तुम्ही माञ शिका, संघटित व्हा, संगर्श करा,
उगा नको माझ्या सारकं ग्यानं मातीत जायला

बाप नांगरणीचा वापा घेत,
बिवा, शिवाला सोबत, घेत शेत नांगरून घेतलं
पेरणी केली, सगळ काय शेती काम होत ते केलं
रोजानं माणसं लावली

पण पाऊस माञ दडी मारतो
बाप परत कर्ज बाजारी होतो ,
सावकारचं कर्ज, सोसायटयाचे कर्ज,
बापाचा जीव वैतागुनं जातो

अखेर बाप निणर्य घेतो, जीवन ज्योत संपवुन देयची
जमिनं, सावकराकडे गहाणं असते,
दर वर्षी प्रमाणे पिकं सुखुनं, मरूण, पडलय जमिनीवरं

विहिराला टिपुस भरं पाणी नाही,
शासकीय योजना गावात आल्याचं नाही
जमिनीचा सातबारा सावकराच्या नावावर
,

बाप राञीचा उठला,
बायका, मुलं झोपेत असताना,
शेतात लिंबाच्या झाडावर बापानं फाशी घेत
जीवन ज्योत संपवली

शासकीय योजना तर गावात आलीचं नाही
पण या गावात येवढया शेतकरयांनी सावकराच्या कर्जाला वैतागुनं
आत्महत्या केली, याची नोंद माञ सरकारी दरबारी झाली
त्या नोंदी मध्ये बापाच नावं टळक अक्षरातं लिहिलं होतं

बापाचं सरणं पेटलं होतं
मुलं अनाथ झाली होती
मुलांची आई विधवा झाली होती

बापाच्या नावानं सरकारन विमा उतरवला होता,
त्या विम्याच्या रक्कमेत,
सावकराच्या घशातुन जमिनं परत काढता आलीच नाही

जमिन ही गेली, बाप ही गेली,
आणि मुलांची आई विधवा होवुनं लोकांच्या शेतात निंदायला, कूरपायला गेली,
पाहिली पाहिली बाजरी, गहु, तीला भेटतं होते

काय करणार, लहान मुलांच्या पोटाची खळगी कोणं भरणार
बापाचा आत्मा माञ कुठे तरी भटकतं असेलं
मुलांनो मोठे व्हा ,शाळेत जा, बाबासाहेब व्हा, सुटा बुटातं रहा

उगा नको माझ्या सारक ग्यानं मातीत जायला
उगा नको माझ्या सारक ग्यानं मातीत जायला

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

Aviator Oyna Və Qazan Rəsmi Sayti Aviator Azerbayca

Next Post

खुनाच्या प्रयत्नातील दोन महीन्यांपासुन फरार असलेल्या आरोपींना खडक पोलीसांनी केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गुन्हे शाखा युनिट ३ यांची उत्कृष्ट कामगीरी  १० तासात खुनातील अरोपी गजाआड….

खुनाच्या प्रयत्नातील दोन महीन्यांपासुन फरार असलेल्या आरोपींना खडक पोलीसांनी केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In