मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासात व्यक्तीमत्व विकासाला चालना देत खेळखेळात राहावे जय पराजय होत असतो मात्र खचून ना जाता आत्मविश्वासानी प्रयत्न केल्यास खूप उंचीवार जाऊ शकतो असे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केली.
यावेळी खेळाडूना मार्गदर्शनात करतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले कि, युवकांमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत ते सुप्त गुण प्रदर्शित करण्यासाठी असे क्रिडा सम्मेलन घेणे गरजेचे आहे, मात्र यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही पण युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाकडून प्रत्येक गांवात पुरस्कार देत असतो, खेळ खेळात असताना हार-जीत होत असते मात्र आपण हरलो म्हणून खचून जाऊ नये विजय एक दिवस आपली पण होऊ शकतो तसेच पुढे बोलताना म्हणाले ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हलिबाल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आम्हाच्या एकच उद्देश्य आहे.युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाचे तालुक्याचे नावलौकीक होत असतो. हे होत असताना गावातीला सामाजिक, शैक्षणिक व विकासाबाबत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.
मूलचेरा तालुक्यातील मथुरानगर येते मथुरानगर प्रिमियर लीगच्या वतिने आयोजित भव्य टेनिस बाल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला बक्षीस वितरक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, आलापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विजय कुसनाके, मथुरा नगरचे प्रतिष्टीत नागरिक मंगल मिस्र्त्रि, कालीपद वैद्य, सोपन राय, सुधीर मलिक, अंनत साना विशाल रापेलीवार, जूलेख शेख, संदीप बडगे, नरेंद्र गरगाम होते. यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष हरीपद साना, उपाध्यक्ष रंजन देवनाथ, सचिव तापस मंडल, सहसचिव असीम रॉय, आयोजक श्री. मनोज राय, वासुदेव बिश्वास, विशाल मंडल, कोशाध्यक्ष राहुल वैद्य व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग उपस्थित होते.
विजयी संघ आलाप्पली ठरली तर उपविजेता संघ मथुरानगर ठरली असून आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

