पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
वाकड पोलीस ठाणे तपास पथक पिंपरी चिंचवड
पुणे : दिनांक ०४/११/२०२२ रोजी १९:३० वा. ते दिनांक ०५/११/२०२२ रोजी सकाळी ०९:३० वा. चे दरम्यान हिझायन प्लाय नावाचे दुकान, स.नं. २० / १ पकवान हॉटेलजवळ, कोकणेनगर, आंध ते रहाटणी रोड, रहाटणी, पुणे येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्लायवुड व कटर मशिन चोरी केले म्हणून तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९४७/२०२२, भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. सदर दुकानातच जून महिन्यात फेव्हिकॉलचे १५ ड्रम चोरी केले म्हणून वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५७३/ २०२२ भादवि कलम ४५४४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. श्री. अंकुश शिंदे सौ, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन यांना गुन्ह्याचे योग्य प्रकारे अन्वेषण करुन तात्काळ अज्ञात आरोपी व मालाचा शोध घेऊन आरोपी अटक करणेबाबत आदेशित केले. त्याप्रमाणे श्री. सत्यवान माने यांनी त्यांचे अधिनस्थ तपास पथकातील सपोनि. श्री. संतोष पाटील व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.
दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व मालाचा शोध घेत असताना घटना घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन घटनास्थळाच्या आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दिनांक ११/११/२०२२ रोजी तपास पथकातील अंमलदार विक्रांत चव्हाण, अतिक शेख, स्वप्नील खेतले व अजय फल्ले यांना त्यांचे बातमीदारमार्फत आरोपीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. लागलीच सदरची माहिती मा. वरिष्ठांना कळवून मिळालेले माहितीप्रमाणे आरोपी नामे कलीमुल्लाह ऊर्फ सद्दाम हाफीझुल्ला खान वय २९ वर्षे, रा. फ्लॅट नं. ६०८ भुसरा टॉवर, साईबाबा नगर, कोंढवा, पुणे, मुळगाव अलावर देवरिया, ता, धानेपुर, जिल्हा गौडा, राज्य उत्तरप्रदेश यास एका फर्निचर दुकानातून शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला. सदर आरोपीने दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याचेकडुन गु.र.नं. ९४७/ २०२२ भादंवि कलम ४५७, ३८० मधील प्लायवुड व कटर मशीन असा सर्व चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला. तसेच गु.र.नं. ५७३/ २०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० मधील चोरीस गेलेले फेव्हिकॉलचे ड्रम जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे आरोपी याचेकडुन दोन्ही गुन्ह्यातील प्लायवूड, कटर | मशीन व फेव्हिकॉल ड्रम असा एकुण २,०८,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचे कामी आरोपी नामे कलीमुल्लाह ऊर्फ सद्दाम हाफीझुल्ला खान यास दिनांक ११/११/२०२२ रोजी २२:०० वा. अटक करण्यात आली असून अधिक तपास करीत आहोत.
सदरची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. संजय शिंदे सो. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले साो. सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाकड पोलीस ठाणे, श्री. रामचंद्र घाडगे, श्री. संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, सपोनि. संभाजी जाधव, पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदु गिरे, स्वप्नील खेतले दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, तात्यासाहेब शिंदे, कौंतेय खराडे, अजय फल्ले, भास्कर भारती यांनी मिळुन केली आहे.

