युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली. दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या विविरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू च्या घटनेने संपूर्ण भंडारा जिल्हा हादळला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चिंचाळा येथे राहणारी सलोनी विनोद नखाते दहाव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी वय 16 वर्ष ही शेळ्यासाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या विहिरीवर गेली होती. तिचा तोल जाऊन ती विहित पडली त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळचा सुमारास घडली या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून रविवारी शोकांकुला वातावरणात चिंचाळ येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
मृतक सलोनी शनिवारी सकाळची शाळा आटपून आई-वडील असलेल्या शेतात गेली त्यावेळी आईने तिला देण्यासाठी पाणी आणण्यासाठी शेताच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या विहिरीवर पाठविले विहिरीतून बादलीने पाणी काढताना पाय घसरून ती विहिरीत पडली. मुलगी अद्याप का आली नाही म्हणून आईने विहिरीकडे जाऊन बघितले तेव्हा विहिरीच्या काठावर सलोनीच्या चप्पल पडून असल्याचे दिसून आल्या पण सोलोनी दिसली नाही. त्यामुळे आईने विहिरीत बघितल तर ती विहिरीत पडल्याचे दिसून आले मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात येतात आईने जोर जोरात ओरडायला सुरूवात केली. सोलोनीच्या आई काय ओरडत आहे हे बघून वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत बघितले असता सलोनी दिसली नाही. दरम्यान, गावकऱ्यांनीही शेताकडे धाव घेतली. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली असता ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोध घेण्यात आला. त्यानंतर सलोनीचा मृतदेह विहिरतून बाहेर काढण्यात आला.