पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : दिनांक १२/११/२०२२ रोजी मार्केटयार्ड परिसरातील गणराज मार्केट, गाळा नं. ११ येथील पी. एम. कुरीअर ऑफिसमध्ये अनोळखी ५ इसमनी प्रवेश करून कोयता व पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्या जवळील पिस्टलमधून फायरींग करून जीवे मारण्याची धमकी देऊन दुकानाच्या ड्रॉवरमधून रोख २७,४५,०००/- रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल असा जबरदस्तीने चोरून नेल्याबाबात मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं- १७३/२०२२ मा पंवि कलम ३२५, ३९७.३४ आर्म अॅक्ट ३ (२५), ४(२५), राह महा पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्यये गुन्हा दाखल होता.
दाखल गुन्ह्याचा समांतर तपास मा. वरिष्ठांचे आदेशाने खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर गांचेकडून चालू असताना खंडणी विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ असे घटनास्थळावरील व आजुबाजूचे सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हे मावळ जि. पुणे येथे लपून बसले आहेत.
सदरची बातमी वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सापळा रखून संशयित इसमांना साई फॉर्म हाऊस, मोयेंगाव ता. मावळ जि. पुणे येथून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इरामांना त्यांची नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे (१) *अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता* , वय २० वर्षे, रा. २३० मंगळवार पेठ, पुणे (२) *आदित्य अशोक मारणे* , वय २८ वर्षे, रा. रामनगर, मनपा शाळेजवळ, वारजे, पुणे (३) *दिपक ओम प्रकाश शर्मा* , वय १९ वर्षे, रा. राहुलनगर शिवणे, पुणे (४) *विशाल सतीश कसबे* , वय २० वर्षे, रा. २३० मंगळवार पेठ, पुणे (५) *अजय बापू दिवटे* , वय २३ वर्षे, रा. श्रीराम चौक, रामनगर, वारजे, पुणे (६) *गुरुजनसिंह सेवासिंह विरक* , वय २२ वर्षे, रा. शिवाजीनगर पुणे (७) *निलेश बाळू गोठे* वय- २० वर्षे व्यवसाय- ड्रायव्हर रा २००. एस. आर. ए. स्कीम, मंगळवार पेठ, असे असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे अन्य चार साथीदार यांचेसह दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडून११,१८,०००/- रू. रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले सात मोबाईल, एक लोखंडी कोयता व मुन्यात वापरलेल्या ३ दुचाकी वाहने अशा एकूण १३,४३,२०० /- रू कि या मुददेमाल पंचनाम्याने जात करण्यात आला आहे. सदर आरोपींना पुढील तपासकामी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त *श्री अमिताभ गुप्ता व मा.सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहायक पोलीस आयुक्त-१, गुन्हे शाखा, श्री गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ च वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे, पो.उप निरी विकास जाधव, श्रेपोउनि यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार मधूकर तुपसौंदर, सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा देबे, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुयोधन गुरद, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, संभाजी गंगावणे* यांनी केलेली आहे.

