श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठा अंतर्गत विविध महाविद्यालयात खो-खो स्पर्धेचे आदित्य अंनतंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दिनांक 15 व 16 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केल्या आहेत.
सदरील स्पर्धेचे उदघाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठच्या मा. कार्यकारी परिषद सदस्य डॉ. अदितीताई सारडा व विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे याच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. आशा देशमुख, खो-खो प्रभारी प्रा. शाहू चव्हाण, कब्बडी प्रभारी डी एफ राठोड सर तर निवड समिती सदस्य प्रा गुलबीले सर व आदित्य शिक्षण संस्था चे सर्व प्राचार्य व प्रशासकीय अधिकारी डॉ. मुंडे सर उपस्थित राहणार आहेत. सदरील या स्पर्धेसाठी जवळपास विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे 28 ते 30 महाविद्यालयाचे संघ भाग घेणार असे महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भूतडा सर यांनी यावेळी सांगितले.