अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -९८२२७२४१३६
सावनेर :- सावनेर तालुक्यातील सुमारे ३६ ग्रामपंचायतींचे कामकाज १६ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे.त्यामुळे १८ डिसेंबर २०२२ रोजी निवडणुका होणार आहेत.येत्या महिन्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, भेटीगाठीचे वातावरण सुरु झाले आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांसाठी पक्ष त्याबरोबरच गावपातळीवर प्रतिष्ठेच्या गटाची तिकीट मिळविने बाबत जुगाड सुरू झाले आहे.
केळवद, उमरी, खैरी ढालगाव, सावळी मोहतकर, बिचवा, कोथुर्णा, चिचोली, इसापूर, पिपळा(डा.ब) बोरुजवाडा, वेलतूर, सिल्लोरी, चांपा, कुसुंबी, भेंडाळा, टाकळी(भ.), सिल्लेवाडा, परसोडी, जोगा, सालई, मंगसा, नंदागोमुख, पांढरी, रामपुरी, खानगाव, कोच्छी, कोदेगाव, रोहणा, मालेगाव (टा), गोसेवाडी, सावरमेंढा, ब्रम्हपुरी, भानेगाव या ३६ ग्रामपंचायतींसाठी ३६ सरपंच तसेच ३२८ ग्रामपंचायत सदस्य निवडून देणे आहे.या निवडणुकीत मुख्य लढत क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुनील केदार आणि भारतीय जनता पक्ष आणि स्थानिक गटांमध्येच होणार हे निश्चित आहे.
३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ३२८ सदस्यांच्या निवडणुकीसाठी ४१९९२ महिला व ४४५५८ पुरुष मतदार असे एकूण ८६३१० मतदार मतदान करून आपले नगर सरकार निवडतील
माजी मंत्री सुनील केदार आणि प्रादेशिक भाजप नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न..
सावनेर तहसीलमध्ये होणाऱ्या ३६ ग्रामपंचायत निवडणुकीत या भागातील आमदार, माजी मंत्री व जेष्ठ नेते सुनील केदार तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रादेशिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केळवद, भानेगाव, नांदागोमुख सारख्या डझनभर मोठ्या ३६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीची प्रतिष्ठा ही वाढताना दिसत आहे. त्याच बरोबर गावपातळी वरील आघाडी आणि भाजप यावेळी माजी मंत्री केदार यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.
१८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या तहसीलमधील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण ८६३१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी एकूण १२३ प्रभागांसाठी १६२ मतदान केंद्रे उभारण्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रताप वाघमारे व अमोल देशपांडे यांनी दीली.

