पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
पुणे : आज दि. १५/११/२०२२ रोजी श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे गार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत अमृतकर, समोआ गुन्हे व पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडील युनिट १ ते ५ तसेच खंडणी, अ.गा.वा. प्र. विभागाचे पोलीस अधिकारी व पोलीस अगलदार यांनी निगडी, देहुरोड व वाकड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर लॉटरी, जुगार, व्हिडीओ पार्लर व | वेश्या व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई करून बेकायदेशीर धंदे उध्वस्त केले आहेत. यामध्ये निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील पवळे ब्रिज जवळील बसस्टॉप मागे असणाऱ्या जयप्रकाश मार्केट मधील १) सचिन शंकर रोमन २) विजय शंकर रोमन, दोघे रा. साईनाथ नगर, निगडी ३) रितेश अशोक केशवानी यमुनानगर निगडी ४) आनंद प्रसाद, रा. मोरे वस्ती चिखली ५) केतन उर्फ बंटी बदाम मुसळे, रा. वाल्हेकरवाडी या लॉटरी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ मा.द.वि. कलम ४२० व द गेनिंग अॅन्ड लॉटरीज् (अमेन्डमेन्ट) अॅक्ट २००९ चे कलम ४ अन्वये एकुण पाय गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ६,०७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये २६ व्हिडीओ गेम मशीन, ०७ एल.ई.डी. टि.व्ही., रोख रक्कम, मोबाईल फोन, व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
देहुरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत साई व्हिडीओ गेम पार्लर या ठिकाणी छापा घालुन साई व्हिडीओ गेम पार्लर चालक समीर शेख रा. देहुगाव व गणेश खंडेलवाल व इतर २ आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच जय मातादी व्हिडीओ गेम पार्लर चालक हरिश विठ्ठल |तिटकरे रा. किवळे याचे विरुध्द कारवाई करून ०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. | याबाबत देहुरोड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५. भा.द.वि. कलम ४२० व द गेमिंग ॲन्ड लॉटरीज् (अमेन्डमेन्ट) अॅक्ट २०१९ चे कलम ४ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले असुन २,७०,०००/- रुपये किंमतीचा गुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये १३ व्हिडीओ गेम मशीन, रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच वाकड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या एका महिला | आरोपीस अटक करण्यात आली असुन दोन पिडीत महिलांची मुक्तता करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला असुनकारवाईमध्ये श्री. प्रशांत अमृतकर, सपोआ गुन्हे व गुन्हे शाखेकडील ०७ पोलीस निरीक्षक ०५ सपोनि /पोउपनि ४० पोलीस अंमलादार सहभागी झाले होते.

