मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकास मारहाण करीत शासकीय सेवा बजावण्यात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकास वर्षभर सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ललित जनार्दन गावंडे वय 38 वर्ष, रा. दत्तमंदिराजवळ, इंदिरानगर असे या आरोपीचे नाव आहे.
शिक्षा झालेल्या आरोपी ललित याने 25 फेब्रुवारी 2012 रोजी माडसांगवी टोलनाक्याजवळ बस चालक शांताराम शिवराम महाले रा. देवळाली गावयांना शिवीगाळ व मारहाण केली होती. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात ललित यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अंमलदार एस.पी कडाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. वाय. सूर्यवंशी व आर. एम. बघडाणे यांनी युक्तिवाद केला.
या प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी ललित ला शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पी. व्ही. अंबादे, के. एस. दळवी यांनी कामकाज पाहिले.