कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर:- पोलीस मित्र संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री. शाम घाडगे सर यांच्या वाढदिवसा निमित्त आज पोलीस मित्र संघ शाखा कोल्हापूर तर्फे वैभवलक्ष्मी ब्लड बँक मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील मिळाला आहे. आजच्या परिस्थिती मध्ये रक्तदानाची खुप आवश्यकता असून सर्वांनी एकत्र येऊन माणुसकी धर्म निभावत चालू पिढीला एक चांगल्या प्रकारे संदेश दिला आहे.
राज्यात व जिल्हात रक्ताच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याची समस्या पोलीस मित्र संघ शाखा कोल्हापूर यांना जाणवली. याच समस्येवर मात करण्यासाठी पोलीस मित्र संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष शाम घाडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे पोलीस मित्र संघ शाखा कोल्हापूर त्यांच्या सहका-यांनी ठरविले. यासाठी पोलीस मित्र संघ शाखा कोल्हापूर या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजनासाठी खास कामगीरी सोपविण्यात आली आहे.
रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान..!
यावेळी उपस्थित पोलीस मित्र संघ संघटक श्री. विठ्ठल ठोंबरे पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. तानाजी चव्हाण, सदस्य अमर पोवार, आकाश काळे, लखन पोवार, दत्ता काळे, स्वप्नील चव्हाण, रवी चव्हाण, अमित चव्हाण, आप्पा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

