पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट-३, पुणे शहर
पुणे : दि. १६/११/२०२२ रोजी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व सतीश काळे यांना मिळालेल्या बातमीवरून आंध्र रोडवरील सेंट थॉमस चर्च समोरील पार्क रोडवर सापळा रचून चोरीच्या रिक्षासह गुन्हेगार नामे १) शादाब युसुफ अन्सारी वय २१ वर्षे रा. गल्ली नंबर २५. सय्यद नगर, हडपसर, गोहम्मदवाडी रोड, पुणे २) अखिल हमीद चौधरी वय ३८ वर्षे रा. गल्ली नंबर १५ सय्यद नगर, हडपसर, मोहम्मदवाडी रोड, पुणे यांना चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी खडकी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दि. २६/१०/२०२२ रोजी राजो ०८/०० ते दि. २७/१०/२०२२ रोजी सकाळी १०/०० वा. चे सुमारास बोडके शहावली दर्गा, जुना पुणे मुंबई हायवे, वाकडेवाडी, पुणे येथून रिक्षा नंबर एम.एच.१२के. आर. २०५४ हि चोरी केली होती. सदर चोरीबाबत माहिती घेता इसग नामे शाहरुख अगजद आतार वय २६ वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा. भोसलेवाडी सर्वे नंबर ५३ वाकडेवाडी, पुणे यांनी त्यांची रिक्षा चोरी गेलेबाबत तक्रार दिल्याने खडकी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २७९ / २०२२ भा.दं.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद आहे…
सदर आरोपींना सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने खडकी पोलीस ठाणेकडील गुन्हयामध्ये अटक करून त्यांना खडकी न्यायालयात त्यांची तपासकामी पोलीस कस्टडी घेवून आरोपींकडे पोलीस कस्टडी रिमांड गुदतीत तपास करता त्यांनी पुणे शहरात खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
१) खडकी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २७९ / २०२२ भादंविक ३७९, ३४ २) दत्तवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २५० / २०२२ भादंविक ३७९
(३) भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ६६०/ २०२२ भादंविक ३७९
४) कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ८२४ / २०२२ भादंविक ३७९
५) कोढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ११४५ / २०२२ भादंविक ३७९ आरोपीकडून वरील गुन्हयातील चोरी केलेल्या ५ रिक्षा व सदरचे गुन्हे करण्यासाठी वापरलेली
१ रिक्षा अशा एकुण ६ रिक्षा किं. रु. २,७०,०००/- च्या गुन्हयाचे तपासात हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक,मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. गजानन टोम्पे त्यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती अनिता मोरे, पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अमलदार संतोष क्षिरसागर, रामदास गोणते शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, प्रकाश कटरे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, साईनाथ पाटील, सतिश काळे, प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.