Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हॉटेल व्यवसायिक कर्जबाजारी झाल्याने बनला दरोडेखोर, सात दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हॉटेल व्यवसायिक कर्जबाजारी झाल्याने बनला दरोडेखोर, सात दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शहरातील रिंग रोडवरील अजय कॉलनीत राहणारे वाहन क्षेत्रातील व्यावसायिक प्रा. डी. डी. बच्छाव आणि किरण बच्छाव यांच्या निवासस्थानी दरोडा प्रकरणी सात संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. हॉटेल व्यवसायात कर्जबाजारी झाल्याने मित्रांसोबत योजना आखत दरोडा टाकल्याची कबुली मुख्य सूत्रधार अनिल ऊर्फ बंडा कोळी वय ३२, रा. विदगाव याने पोलिसांना दिली. न्यायालयाने सर्व संशयितांना २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बच्छाव यांच्या निवासस्थानी १४ नोव्हेंबरला रात्री दरोडा पडला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता काही तरुण सलग पाच दिवस बच्छाव यांच्या निवास स्थानावर नजर ठेवत असल्याचे दिसले. वेगवेगळ्या पथकांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास केला. दरोडेखोर हे सराईत नसून स्थानिक असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तांत्रिक मुद्यांच्या आधारावर शुक्रवारी रात्री अनिल ऊर्फ बंडा कोळी, करण सोनवणे १९, यश ऊर्फ गुलाब कोळी २१, दर्शन सोनवणे २९, अर्जुन कोळी- पाटील ३१, सचिन सोनवणे २५, सागर कोळी २८, सर्व रा. विदगाव यांना अटक केली. पथकाने शुक्रवारी रात्री विदगाव येथून काहींना, तर आव्हाणे, जैनाबाद परिसरातून इतरांना अटक केली.

या टोळीतील मुख्य सूत्रधार अनिल ऊर्फ बंडा कोळी हा हॉटेल व्यावसायिक आहे. व्यवसायात कर्जाचा बोजा वाढला होता. वर्षभरापूर्वी तो बच्छाव यांच्या मोटारींच्या शोरूममध्ये आला होता. तेव्हा बॅगमध्ये पैसे ठेवताना त्याने पाहिले होते. काही महिन्यांपूर्वी भरपूर कर्ज झाल्यामुळे त्याने त्याच्या मित्रांसह दरोड्याची योजना आखली. दरोड्यात चांगली रक्कम मिळेल, असे आमिष मित्रांना दाखविले. योजना तयार झाल्या नंतर दरोडेखोरांनी बच्छाव यांच्या निवासस्थानावर पाळत ठेवली. ११ नोव्हेंबरपासून त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी ठरले. सलग दोन ते तीन दिवस एकाने बच्छाव यांच्या निवासस्थानाजवळ पाळत ठेवली. १४ नोव्हेंबर रोजी दरोडा टाकला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मुंबई: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 60 हजार रुपये महिन्याची नोकरी, 10वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी.

Next Post

सायकल यात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, शिक्षक अमनदीप शिंह खालसा यांनी अनोखी सायकल यात्रा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सायकल यात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, शिक्षक अमनदीप शिंह खालसा यांनी अनोखी सायकल यात्रा.

सायकल यात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, शिक्षक अमनदीप शिंह खालसा यांनी अनोखी सायकल यात्रा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In