प्रशांत जगताप, संपादक
सेवाग्राम:- गांधी स्मारक प्राकृतिक चिकित्सा समिती नई दिल्ली, महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ सेवाग्राम व आयुष इंटर नॅशनल मेडिकल असोसिएशन विदर्भ रिजन यांच्या संयुक्त विदिमानाने दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी शान्ति भवन, नई तालीम परिसर, बापू कुटी, सेवाग्राम येथे “राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम सोहळ्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून श्रीमत राजे डॉ. मुधोजी भोसले, महाराजा ऑफ नागपूर, विशेष अतिथी म्हणून लक्ष्मिदास सर, अध्यक्ष गांधी स्मारक प्राकृतिक चिकित्सा समिती नई दिल्ली नारायणभाई भट्टाचार्य महामंत्री गांधी स्मारक प्राकृतिक चिकित्सा समिती नई दिल्ली, डॉ विनोद पाठक, डॉ आदित्य भारद्वाज, व आयुष आयुष इंटर नॅशनल मेडिकल असोसिएशन विदर्भ रिजनचे पदाधिकारी डॉ. विनोद ढोबळे व डॉ. सुधीर मोगरे, जयंतभाऊ तिजारे प्रहार जनशक्ती पक्ष वर्धा जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महात्मा गांधींच्या भजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, नभ रोका यांनी आपल्या सुन्दर नृत्या द्वारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. योगा प्तात्याक्षिक भाग्यश्री मुळे यांनी सादर केले.
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनाचे औचित्य साधून प्राकृतिक चिकित्सा क्षेत्रातील दिग्गजांना “महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा अवार्ड -२०२२” देऊन गौरावान्न्वित करण्यात आले. महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा जिवन गौरव अवार्ड – २०२२ चे मानकरी डॉ. भालचंद्र नेटके, डॉ धनंजय कुटेमाटे, डॉ. विनोद पाठक, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. सुधीर मोगरे, डॉ. मनोज बागडे यांना सन्मानित करण्यात आले.
महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा ग्लोबल अवार्ड – २०२२ चे मानकरी डॉ. प्रशांत तळवेकर, डॉ. धनंजय पाणबुडे तसेच नवोदित प्राकृतिक चिकित्सकांना महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा स्वास्थ रक्षक अवार्ड व महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा स्वास्थ मित्र अवार्ड चे वितरण सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विध्यापीठ सेवाग्राम येथील डॉ. प्रशांत तळवेकर, डॉ धनंजय पाणबुडे, नीलिमा तळवेकर, विवेक धोंगडे, ऋषिकेश बडवाईक, डॉ. मयूर दांडेकर, डॉ. मनीष गाज्जुडे, साक्षी रामटेके, बरखा रोका, डॉ, निखिलेश केलवदकर, अनिकेत देवडे, महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विदयापीठ सेवाग्रामच्या सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

