मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येतील पदमा नरेश बोम्मावार यांचा चौडमपल्ली येते दर्शनाला जात असतांना ओढ़नी दुचाकीत अडकून अपघातात त्यांचा काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यु झाला होता.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नरेश बोंम्मावर यांच्या एटापल्ली मार्गावरील राहत्या घरी जाऊन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी नुकतीच सांत्वना भेंट दिली. बोम्मावार परिवाराशी आस्थेने संवाद साधत ह्या दुर्दैवी घटनेची पूर्ण माहिती घेतली. ह्या दुःखद प्रसंगी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बोंम्मावार कुटूंबियाचे सांत्वन केले. ह्यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348