मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे नाशिक औद्योगीक वसाहतीत पिठ मळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेत एका 40 वर्षीय शेजारी राहणाऱ्या इसमाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. चंदू सैंदाणे असे संशयिताचे नाव आहे. मुलीने आपबिती आपल्या कुटूंबियांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, पोलिसांनी सैंदाणे यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगीक वसाहतीतील शिवार हॉटेल भागात राहणा-या पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडितेचे कुटुंबिय आणि संशयित एकमेकांचे शेजारी असून ते एका चाळीत राहतात. मंगळवारी दि.२२ सायंकाळच्या सुमारास मुलीच्या घरी कोणी नसतांना संशयिताने तिला पिठ भिजवण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते. किचनमध्ये मुलगी पिठ भिजवत असतांना संशयिताने तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी परतलेल्या कुटुंबियाकडे कथन केल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

