पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे : दत्तवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथक यांना चोरीस गेलेल्या वाहनाचा व आरोपीचा शोध घेणेकामी व वाहन चोरीस आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी चंद्रकांत कामटे व स्टाफ गस्त करीत असताना तपास पथकातील पोलीस अमलदार प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला व दयानंद तेलंगे पाटील यांना त्यांचे खास बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की जनता वसाहत बागेजवळुन पल्सर २२० सी. सी गाड़ी चोरणारा इसम हा जनता वसाहत जयभवानीनगर मध्ये गणपती मंदीराजवळ गल्ली नं ८ येथे आलेला आहे.” अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे तपास पथकाच्या दोन टीम तयार करून बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन आरोपी नामे रोहित विष्णु क्षीरसागर, वय २२ वर्षे, रा. गल्ली नं ८ घर नं १९४ जयभवानीनगर, जनता वसाहत पुणे. मुळगाव- मु पो किल्लारी, किल्लारी पोलीस स्टेशनमागे, ता. औसा, जि. लातुर यास अत्यंत शिताफीने पकडून त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे विधी संघर्षत दोन साथीदारांचे साहाय्याने जनता वसाहत व दत्तवाडी भागातून चार गाडया चोरल्याचे कबुल केले व त्या चारही गाडया काढुन दिल्या.त्याबाबत
१) दत्तवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. २४४/२०२२ भा.द.वि कलम ३७९, ३४
२) दत्तवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. २६९/२०२२ भा.द.वि कलम ३७९, ३४
३) दत्तवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. २७०/२०२२ भा.द.वि कलम ३७९, ३४
४) दत्तवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. २२२ / २०२२ भा.द.दि कलम ३७९,३४ तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतुन देखील २२० सीसी पल्सर चोरल्याचे सांगितले. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. १३८ / २०२२ भा.द.वि कलम ३७९ ३४ प्रमाणे दाखल आहे.
वरील आरोपीकडुन दत्तवाड़ी पोलीस ठाणे कडील चारही गुन्हयांतील १,९०,०००/- रुपयेच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सदरचा आरोपी हा लातुर चा असुन त्याने मौज-मजा करण्यासाठी पुणे शहरातुन बजाज कंपनीच्या २२० सी.सी. पल्सर गाडया चोरल्याचे सांगितले.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा.राजेंद्र डहाळे, पोलीस उप- आयुक्त सो परि ३ मा सोहेल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग मा. सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गा. अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) गा. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कागठे, पोलीस अगंलदार प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे पाटील, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, किशोर वळे, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल दबडे, अमित चिन्हे, प्रशांत शिंदे सद्दाम शेख आणि नवनाथ भोसले यांनी केली आहे.