युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
कळमेश्वर येथील लुंबीनी बुद्ध विहारा चे प्रांगणात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती बामसेफ व बि. आर. एसपी. च्या आयोजनात मा. कृष्णाजी बगडे सर. अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघटना कळमेश्वर यांचे अध्यक्षते खाली घन्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर अरूणभाऊ सहारे जाँईंट सेक्रेटरी प्रतिभावंत प्रबोधनकारी कलावंत संघटना यांनी केले. मा. प्रा. हरिभाऊ शेंडे सचिव जेष्ठ नागरिक संघटना कळमेश्वर. मा. राहूल वानखडे प्लेबॅक सिगर कळमेश्वर. यांनी साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्ष मय जिवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रा. शेंडे सर म्हणाले कि अण्णा भाऊ साठे यांनी म्हटले कि हि पुरूथवी नागाच्या डोक्यावर नसून या जगातील समस्त कामगार कष्ट करी शेतकरी मजूरांच्या तळहातावर तरलेली आहे. एका झटक्यात भटांनी लिहिले ल्या कपोलकल्पित गोष्टीला अण्णा भाऊ साठे यांनी नाकारले. या कार्यक्रमाल. बि. आर. एस. पी. चे तालुका संघटक युवा कार्यकर्ते मा. रोषण बागडे कळमेश्वर युवा कार्यकर्ते हस्ते हे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बामसेफ बि. आर. एस. पी. चे मा. गौतम जांभुळकर सर यांनी पार पाडले या प्रसंगी जेष्ठ नागरिक चे ओळख पत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची व्यवस्था बामसेफ चे मा. दिपक मेश्राम यांनी केली होती.या कार्यक्रमाला तालुक्यातील मंडळी उपस्थित होती

