Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

आता वृक्षच देईल स्वत:बद्दलची माहिती वन मंत्र्यांच्या हस्ते झाडा वरील ‘क्यूआर कोडचे’ लोकार्पण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 25, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आता वृक्षच देईल स्वत:बद्दलची माहिती वन मंत्र्यांच्या हस्ते झाडा वरील ‘क्यूआर कोडचे’ लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर,दि.24:- झाडाची संपूर्ण माहिती, त्याचे उपयोग आदी बाबी जाणून घेण्यासाठी चंद्रपूर येथील वन प्रबोधनीने अभिनव उपक्रम राबवून झाडावर ‘क्यूआर कोड’ विकसीत केला आहे. या क्यूआर कोडचे लोर्कापण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन प्रबोधनीच्या परिसरात नुकतेच करण्यात आले. विशेष म्हणजे या क्यूआर कोडच्या माध्यमातून आता झाड स्वत:बद्दलची माहिती स्वत:च देणार आहे.

‘टॉकिंग ट्री’ म्हणजेच बोलणारे झाड असा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रपूर वन प्रबोधनीच्या परिसरातील विविध प्रजातींची झाडे मोबाईलद्वारे ओळखता येऊ शकणार आहे. तसेच प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वन प्रबोधनी परिसरातील प्रत्येक झाडावर पाटी स्वरुपात क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. ‘टॉकिंग ट्री’ या मोबाईल ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाड स्वत:बद्दल विविध भाषेमध्ये माहिती देणार आहे.

वन प्रबोधनी परिसरात मोठ्या प्रमाणात वन व वनेत्तर प्रजातींची झाडे असून या ॲपच्या वापरा मुळे परिसरातील जैव विविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे शक्य होणार आहे. क्यूआर कोडचे लोकार्पण केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विसापूर येथे तयार होणा-या बॉटनिकल गार्डनमध्येही वन विभागाने हा उपक्रम राबवावा. तसेच या उपक्रमाचा विस्तार गंगोत्री प्रमाणे करण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे झाडावर क्यूआर कोडची अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल वनमंत्र्यांनी प्रबोधनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांचे अभिनंदन केले. यावेळी कॅम्पाचे प्रधान मुख्य संरक्षक शैलेश टेंभुर्णे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, वन प्रबोधिनीचे सल्लागार मंगेश इंदापवार आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कोपरगाव शहरालगत टाकळी फाट्याजवळ जुगार अड्ड्यावर छापा, 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत, 28 जुगाऱ्याना अटक.

Next Post

धांनाचा ढिगाराला लागली आग, आगीत धान थ्रेशर सहीत ट्रॅक्टर जळून खाक, धाबा येथील घटना शेतकर्यांचे लखोचे नुकसान.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धांनाचा ढिगाराला लागली आग, आगीत धान थ्रेशर सहीत ट्रॅक्टर जळून खाक, धाबा येथील घटना शेतकर्यांचे लखोचे नुकसान.

धांनाचा ढिगाराला लागली आग, आगीत धान थ्रेशर सहीत ट्रॅक्टर जळून खाक, धाबा येथील घटना शेतकर्यांचे लखोचे नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In