सचिन पावरा, जळगाव प्रतिनिधी
जळगाव:- कवियात्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहाला भेट दिली व यावल प्रकल्पअधिकारी श्रीमती विनिताताई सोनवणे मॅडम यांना घटनास्थळी बोलावून यावेळी विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडविण्यात आल्या. विनिता सोनवणे मॅडम यांना घटनास्थळी भेट दिली. यावेळी या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या आणि काही समस्या यावेळी सोडवण्यात आल्या. आणि राहिलेल्या समस्या याचा पाठपुरवठा करून त्या लवकरच मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रशासनाला पत्र व्यवहार करू असे यावेळी सांगण्यात आले.
आज शिक्षण घेताना अनुसुचित जमाती या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या निर्माण होत आहे. या समस्यामुळे विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव हे त्यांच्या समस्या आणि त्यावर समाधान करण्यासाठी ते आले होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348