मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या आई वडिलांनीच पोटच्या अवघ्या काही तासांच्या अर्भकाला रस्त्यावर फेकल्याची घटना घटली आहे. मुलगी झाली म्हणून क्रूर आई बाबाने अर्भकाला पिशीवीत बांधून रस्त्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक शहरात स्थायिक असलेल्या जोडप्याने अर्भकाला पिशवीत भरले आणि घराच्या बाहेर चालत चालत जात रस्त्याच्याकडेला फेकून दिले. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर फेकून दिल्याने ती (अर्भक) रडत होती. आवाज ऐकून भटक्या कुत्र्यांनी त्या अर्भकाचे लचके काढले. त्या कुत्र्यांनी त्या अर्भकाचे येवढे लचके काढले की काही वेळातच तिचा जीव गेला.
त्यामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना मंगळवारी समोर आली त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला मात्र या घटनेमुळे पोलिसांनीही हळहळ व्यक्त केली. जन्मदात्यांनाच ती नकोशी होती त्यामुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होवू लागली आहे.

