पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- शहरामध्ये सध्या फायरिंगचे प्रमाणात वाढ होत असल्याने मा. पोलीस आयुक्त सो यांनी पाहिजे/ फरारी / तडीपार व हत्यार बाळगून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे आदेशाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हदीत पाहिजे/फरारी / तडीपार आरोपी व चाहनचोरीचे आरोपीचा शोध घेणेकामी गस्त करीत असताना पोलीस पथकास गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील व सध्या तडीपार असलेला इसम नामे अजय शंकर सुतार वय २० वर्षे रा. श्रीनिवास अपार्टमेंट, फ्लॅट नं ०९, गंधर्व हॉटेल चौक, पिराजीनगर, नऱ्हे गाव पुणे हा वडगाव ब्रिज येथील दांगटनगर परिसरामध्ये सार्वजनिक रोडवर थांबला असुन त्याच्याकडे गावठी कट्टा आहे. सदर बातमीच्या अनुशंगाने पोलीस पथकाने दांगटनगर, वडगाव ब्रिज, पुणे येथे सापळा रचन नमूद तडीपार इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३०,३००/- रुचे एक देशी बनावटीचे पिस्टल में एक जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु. २. क्र. ५११/२०२२ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ सह शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) सह म.पो अधिनियम ३७(१)(३) १३५ अन्वये दाखल करण्यात आला असून पूढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त सो श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त सो, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. श्री. अमोल झंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ मा. श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम सपोनि नरेंद्र पाटील, श्रेणी पोउनि शाहिद शेख, पोहवा बाळु गायकवाड, पोना जाधव, गणेश ढगे, रविंद्र लोखंडे व पो. अंमलदार श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

