पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- फिर्यादी यांनी इसम नामे असीफ ईस्माईल खान वय ३३ वर्षे रा. कोनार्क पुरम सोसायटी, बंगला नंबर ३८, कोटवा पुणे व त्याचे साथीदार फरियाज पठाण, समीर शेख, शाहबाज खान यांनी गुन्हयाचा कट रचुन फायरिंगच्या खोट्या गुन्हयात अडकविणेची व जिवे मारणेची धमकी देवून ८० लाख रु खंडणी मागीतल्याची तक्रार दिल्याने कोंढवा पोलीस स्टेशन पुणे येथे कोंढवा पो स्टे गु.र.नं. ११८५/२०२२ भा.द.वि. कलम ३८५.३८७, ३८९, १२०(ब) अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.
इसम नामे असीफ ईस्माईल खान वय ३३ वर्षे रा. कोनार्क पुरम सोसायटी, बंगला नं. ३८,कोढवा खुर्द पुणे याने दिनांक २६/११/२२ रोजी बोपदेव घाट, कोंढवा पुणे येथे त्याचे साथीदारासह मोटर सायकलवरुन घरी येत असताना दोन अज्ञात इसमांनी गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला
म्हणून तक्रार दिल्याने कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.न. ११७००/२२ भादवि कलम ३०७,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) प्रमाणे खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
गुन्हयाच्या घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फिर्यादी नामे असीफ खान यांने फायरींगचा खोटा बनाव केल्याचा छडा लावुन त्याचा कट उधळला. सदर खोटया फायरिंगमध्ये व्यवसायिक संतोष थोरात यांना अडकविणेची धमकी देवून आसिफ खान ज्याने त्याचे साथीदारासह कट करुन त्याचेकडे ८० लाख रु. ची खंडणी मागुन व साक्षीदारावर दबाव आणला त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन आसिफ खान व त्याचे साथीदाराविरुध्द कट करून खंडणी मागितलेवरुन कोंढवा पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी असीफ खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध करमाड पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामीण येथे दरोड्याचे ०२ व चंदननगर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा ०१ असे एकुण ०३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी मागत असेल तर नागरिकांनी निर्भीडपणे समोर येऊन तक्रार द्यावी असे गा पोलीस आयुक्त पुणे शहर यांचेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह- आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हें पुणे शहर श्री. अगोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, राजस शेख, शहाजी काळे, आश्रुबा मोराळे, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, विलास खंदारे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

