महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्यांचा कालावधी नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत संपला असून आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे अनेक हवसे, गवसे, नवसे सह गावाच्या विकाससाठी झटणारे अनेक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना, सदस्य व सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यंदा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्यामुळे अगोदरच पासून उमेदवारांनी गावांत राजकीय मोर्चेबांधणी सुरु केली होती. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे.
ओझर खुर्द येथे शेतकरी विकास मंडळ उमेदवारी अर्ज दाखल.
आज शेतकरी विकास मंडळ ओझर खुर्द पॅनलच्या वतीने तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर खुर्द येथील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी साबळे गिरिजा अण्णासाहेब, वर्पे दिपाली भाऊसाहेब, शिंदे सविता सुरेश या सर्वांनी सरपंच पदासाठी आज अर्ज दाखल केले या वेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच पुंजाहारी शिंदे व अंभोरे गावचे लोकनियुक्त सरपंच भास्कर खेमनर सह ओझर खुर्द येथील शेतकरी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

