पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, इसम नामे कांतीलाल रणछोडदास मेवावाला वय ७७ वर्षे रा. ए विंग ८०२ वाईसरॉय पार्क फ्लॉट नं.३ सेक्टर १८ सानपाडा नवी मुंबई हे दिनांक ०२/१०/२०२२ रोजी मुंबई येथून पुणे येथे फिरण्यास आले असता ते केंब मधुन फिरत असताना त्यांना केंब मधील ड्रायव्हर व त्याचे दोन साथीदार यांनी वृद्ध कांतीलाल रणछोडदास मेवावाला यांचेकडुन जबरदस्तीने एटीएम कार्ड व त्याचा पिन नंबर घेवून वेगवेगळ्या एटीएम मधून पैसे काढुन घेतल्याने सदर बाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४७८/२०२२ भादवि कलम ३९२.३४ अन्वये तीन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिंहगड पो स्टे कडील तपास पथकातील अधिकारी / कर्मचारी पो स्टे हददीत गस्तीवर असतांना सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारानुसार व पोलीस शिपाई / ८१६९ अविनाश कोडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वृध्द कांतीलाल मेवावाला यांना दि. ०२/१०/२०२२ रोजी जबरदस्तीने लुटणा-या इसमापैकी एक इसम नवले पुलाचे खाली थांबलेला आहे. त्याने अंगात फुल बाहयाचा राखडी आडव्या लाईनचा शर्ट व अंगात फुल राखडी पॅन्ट, रंगाने काळा सावळा, चेहरा उमट, डोक्याचे केस वाढलेले त्याचे वय २१ ते २५ चे दरम्यान अशी बातमी मिळाल्याने बातमी नुसार सदर ठिकाणी सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारता त्याचे नाव कृष्णा उत्तम सोनवणे वय २२ वर्षे रा. विठ्ठल रुक्मीणी, सोसायटी, तळ मजला, शिव पार्वती हौसिंग सोसायटी, सोन चौक, चिखली पुणे असे असल्याचे सांगितले त्यास वरील स्टाफचे मदतीने सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे येथे आणुन त्याचे कडे संदर्भय गुन्हया बाबत तपास करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार श्रीधर साहु व साहुचा एक मित्र यांचे सह केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून त्याने व त्याचे पाहिजे साथीदार यांनी वृध्द इसमाकडुन जबरदस्तीने काढून घेतलेल्या एटीएम कार्ड व त्याचा पिन नंबर घेवुन त्या कार्डचा वापर करुन त्यांने व त्याचे पाहिजे साथीदार यांनी खरेदी केलेल्या वस्तु त्याचे कडुन ९९,९२७/- रुपये किमतीची सोन्याची चैन, ७९,०००/-रुपये किंमतीचा आयफोन, ५०,०००/-रुपये किंमतीची दुचाकी व गुन्हा करताना चारपलेली गुन्हा करताना वापरलेली ५,००,०००/-रुपये किंमतीची टाटा झेस्ट फोर व्हीलर गाडी असे एकुण ७.२८.९२७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद अटक आरोपी हा पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.५१२/२०२२ भादवि कलम ३९४,४११,३४ मध्ये फरारी आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सचिन निकम सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत. समस्त ओला, उबेर कॅब मधून प्रवास करणा-या वृध्द महिला व नागरीकांनी विशेष काळजी घेवुन कॅब मधुन प्रवास करावा.
सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३. श्री सुहेल शर्मा, सो, सहा पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग श्री सुनिल पवार सौ वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी सहा पोलीस उप निरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस हवालदार संजय शिंदे, पोलीस नाईक अमित बोडरे, पोलीस अंमलदार अविनाश कोंडे, देवा चव्हाण, सागर शेडगे, स्वप्नील मगर, शिवाजी क्षिरसागर राहुल ओलेकर, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडोळे यांच्या पथकाने केली आहे.

