✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757
हिंगणघाट (वर्धा):- थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, राजु बापुराव आठोडे वय 41 वर्ष, रा. सुलतानपुर त. हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशन ला येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक 30 नोव्हेंबर ला 6 वाजताच्या दरम्यान त्यांनी त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम.एच. 27/ए.टी./2630 किंमत 20,000/- रूपये किमतीची घेवुन कपडे घेण्याकरीता हिंगणघाट शहरात येवुन आपली गाडी राजघराणा साडी सेंटर, सुभाष चौक हिंगणघाट येथे उभी केली असता कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेली. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवर पो.स्टे.ला अप. क्रमांक 1257/2022 कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांनी व त्यांचे पथकाने कसोशीने तपासचक्र फिरवुन आरोपी नीलेश मोरेश्वर धोटे वय 27 वर्ष रा. काचनगाव पो.स्टे. वडनेर जि. वर्धा यास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम.एच. 27/ए.टी./2630 किंमत 20,000/- रूपये किमतीची जप्त करून आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पोलिस गुन्हे प्रकटीकरण हे करीत आहेत.