पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- तक्रारदार यांना त्यांनी मोठा आर्थीक घोटाळा केला असून बन्याच लोकांची आर्थीक फसवणुक केली असल्याचे खोटे सांगुन त्यांचे विरूद्ध आर्थीक फसवणुकीचा गुन्हा नोंद करावयाची व्यवसायाचे नुकसान होईल, अबु जाईल अशाप्रकारे भिती दाखवुन, तसेच दमदाटी व शिवीगाळी करून सदरची खोटी तक्रार नोंद न करणेकामी खंडणी स्वरूपात रक्कमेची मागणी करून सदरची रक्कम तक्रारदार यांचेकडून वसूल करणेसाठी बंदुकीचा वापर करून यातील तक्रारदार यांना त्यांचे जिवीतास धोका असल्याचे दाखवुन तक्रारदार यांचेकडून खंडणी स्वरूपात जवळपास ६ लाख रूपये घेवून फरार झालेला आरोपी नामे असीफखान ईस्माईलखान पठाण, रा. कोणार्क पुरम, बिल्डींग नं.३८ कोंढवा पुणे मुळ रा. अमीर नगर, बीड बायपास, औरंगाबाद व त्याचे साथीदार असलेले आरोपी समीर मेहबुब शेख, जॉन व इतर २ अनोळखी आरोपी इसम यांचे विरुध्द तक्रारदार यांनी चंदननगर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार नोंद केले वरून चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं.४२४/२०२२ भादवि कलम ३८४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.
सदरचा गुन्हयाचे तपासामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर मुख्य आरोपी असीफखान पठाण हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता व तो गुन्हा केल्यानंतर बिड, जालना, औरंगाबाद परिसरात रोज जागा बदलुन राहत होता. त्याचे सहसाथीदार असलेले आरोपी नामे १) समीर मेहबुब शेख, वय ३६ वर्षे, रा. संतोष नग जामा मज्जीद शेजारी, कात्रज पुणे, २) शहाबाज नेहमुद खान, वय ५० वर्षे, रा. स.नं.७०, संतोष नगर, कात्रज पुणे तसेच खंडणीची रक्कमेची विल्हेवाट लावणेकामी मदत केलेला आरोपी इरफान हसन भोला वय २५, रा. गल्ली क्र.३, आनंद मठ शेजारी पर्वती पायथा स्वारगेट पुणे यांना दाखल गुन्हयामध्ये अटक करणेत आलेली असून, फरार असलेला मुख्य आरोपी असीफखान पठाण व त्याचा अजुन एक साथीदार फरियाज हसनखान पठाण, वय ३९ रा. कात्रज संतोष नगर पुणे यांना चंदननगरचे पोलीस अधिकारी अरविंद कुमरे, पोलीस उपनिरीक्षक व सोबत पो. अमंलदार संकपाळ, नामदेव गडदरे यांचे टिमने गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाचे सहाय्याने औरंगाबाद येथून अटक केली आहे.मुख्य आरोपीविरुध्द औरंगाबाद, पुणे शहरामध्ये खंडणी व जबरी चोरीसारखे ०४ गुन्हे दाखल आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर श्री. शशीकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर, श्री. किशोर जाधव, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, श्री. राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंदननगर पो.स्टे. पुणे मा. जगन्नाथ जानकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी अरविंद कुमरे, पो अमंलदार संकपाळ नाणेकर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, सुभाष आव्हाड, गणेश हांडगर, विकास कदम, नामदेव गडदरे यांनी केली आहे.

