मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाइन त्र्यंबकेश्वर:- नाशिक शहरात ‘लव्ह जिहाद’ विरोधात काढण्यात आलेल्या हिंदू मूक मोर्चानंतर आज त्र्यंबकेश्वर येथेही हिंदू सकल मोर्चा काढण्यात आला.
दिल्ली येथील श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत लव्ह जिहादला प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनानी त्र्यंबकेश्वर शहरातून विराट मोर्चा काढला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात संपूर्ण तालुक्यातून हजारो हिंदुत्वप्रेमी भगव्या टोप्या घालून सहभागी झाले. या मोर्चात साधू व महंताचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी करण्यात आला होता.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

