विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन राहुरी:- तालुक्यातील आठवडे बाजारातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी चोरट्यांनी चार मोबाईल लांबवले आहे. यात दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, नऊ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, सात हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पाच हजार रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल असा 31 हजार रुपये किमतीचा ऐवज एका अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याप्रकरणी राहुरी पोलिसांनी उल्हास छबुराव गायकवाड वय 61, राहणार नांदगाव, तालुका राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक खंडागळे करीत आहेत.
चोरट्यांनी आता आठवडे बाजार वा अन्य गर्दीच्या ठिकाणी जमलेल्यांच्या खिशातून त्यांचे मोबाईल लांबवण्याचे प्रकार सुरू केले आहेत. नगर शहरात व जिल्हाभरात अशा घटना वाढत आहेत. या मोबाईल चोरांना पकडण्याचे आव्हान पोेलिसांसमोर आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

