राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समुहा कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनोखी मानवंदना देण्यात आली. दादर येथील चैत्यभुमी येथे विनामूल्य आरोग्य शिबिर, धम्मलीपी कार्यशाळा आणि प्राचीन ऐतीहासिक लेणीबद्दल जनजागृती करून ही अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
एकजूट लेणी समूहाने अविरत दिनांक 4 डिसेंबर पासूनच मेहनत करून असंख्य अनुयायांना सेवा प्रदान केली. वरळी मुंबई येथील माता रमाई स्मुर्ती स्मारक प्रचारक व एकजूट समुहाचे स्वयंसेवक शुभम डोळस यांनी स्थानीय व्यवस्थानाची धुरा सांभाळत सहकार्य केले.
जवळ जवळ 5000 लोकांनी डॉ. रविद्र तेलगोटे डॉ. अरुण दुधमल, डॉ. सुर्यभान डोंगरे यांच्या मार्गदर्शन खाली विनामूल्य वैद्यकीय आरोग्य तपासणी वऔषध वितरण आणि चष्मे वाटप सेवेचा लाभ घेतला.
प्राचीन सम्राट अशोक कालीन व सातवाहन कालीन लिपीचे जानकार सुरज सोनकांबळे सर यांनी 10000 अनुयायांना धम्मलिपी (पाली) भाषा तोंड ओळख करीत उपस्थीतांनी शिकण्याचा प्रण घेतला. बुद्ध लेणीवरील सुरू असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध हजारोंच्या संखेने अनुयायांनी स्वाक्षरी देऊन ऐतिहासिक लेणी संवर्धन करण्याच्या कार्यात जोडून घेतले आहे.
लोकशाहीर वेदांत मोरे आणि योगदान फाउंडेशनने अभिवादनगितांच्या माध्यमातून जनजागृती केली. एकजूट लेणी महिला आघाडीच्या प्रज्ञाताई जगताप, मोनालीताई वाघमारे, डॉ.सुनीतीताई तेलगोटे, भुमिकाताई डोळस, संगीताताई काटे, रेखाताई कांबळे, वैशालीताई पाटील, सिमाताई लाटकर, संघमित्राताई सोनवणे, सरस्वतीताई सावणे, कविताताई जमदाडे यांनी बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी बुध्द लेणी जतन केली पाहिजे असे मत कृतीमधून मांडले.
भविष्यामध्ये महाराष्ट्रातील लेणी संवर्धन अधिक वेगाने होण्यासाठी अधिक एकजुटीने प्रयत्न करू असा संकल्प एकजुट समूहाचे दादुस डोळससर, विवेक वाघमारेसर, अर्जुन काटेसर, प्रफुल पुरळकरसर, अँड विनोद हटकरसर, संजय सोनवणे, सागर कांबले यांनी केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348