जिल्हा वार्षिक निधी सन २०२१-२२ अंतर्गत माता मंदिर कडील नदी घाट रस्त्याचे होणार ३४५ मि. खडीकरण.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिवरा या गावातील पांदण रस्त्याच्या खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन आज दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोज रविवारला सकाळी पार पडले. हिवरा गावातील जुनी वस्ती माता मंदिराकडून नदी घाट जाणाऱ्या पांदण रस्त्याच्या मार्गाचे ३४५ मिटर अंतर खडीकरण बांधकाम होणार आहे.
सदर रस्त्याचे बांधकाम जिल्हा वार्षिक निधी सन २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेले असून, मंजूर निधीतून ३४५ मीटर अंतर लांबीचे खडीकरण होणार आहे.ज्यामुळे त्या मार्गावरील दररोज रहदारी करणारे शेतकरी व नदीकडे जाणाऱ्या नागरिकांना चिखलमय मार्गापासून ३४५ मीटर अंतरावर काहीसा दिलासा मिळेल. रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच निलेश पुलगमकर, उपसरपंच वर्षा कुत्तरमारे, सदस्य जितेंद्र गोहणे, माजी उपसरपंच प्रकाश हिवरकर, रो. सेवक भिवसण चहारे, पोडसा सरपंच देवीदास सातपुते, कृ.ऊ.बा.स. माजी उपसभापती अशोक रेचनकर,ह.मंदिर अध्यक्ष देवाजी पा.चहारे, हरिश्चंद्र पा.कुत्तरमारे, चंपत पुडके, विलास कुत्तरमारे सदस्य सेवा.सह.संस्था, जयंत चहारे, सुभाष कुत्तरमारे, वामन कुत्तरमारे,संतोष कुत्तरमारे,चेतन चहारे व गावातील नागरिक उपस्थित होते
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

