भंडारा जिल्हा प्रतिनिधी
भंडारा:- येथून एक संतापजनक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर दोन इसमांनी अत्याचार करीत विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकले. ही खळबळ जनक घटना दि. 3 जुलै ला उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते, त्यामुळे नागरिकांना मध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची भावना आहे.
ही घटना अत्यंत संतापजनक असून ज्यावेळी महिलेला रस्त्यावर फेकून देण्यात आले त्यावेळी तिथले नागरिक अधिक संतप्त झाले होते. महिलेची आणि दोन संशयितांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांना तपास करणं अधिक सुलभ होणार आहे. महिलेने पोलिसांना दोघांनी अत्याचार केल्याची माहिती दिली आहे. महिलेच्या तब्येत बरी नसल्याने त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांची नीट चौकशी करण्यात येणार आहे.
पीडित महिला ही गोंदिया जिल्हातील राहणारी असून कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान विवस्त्र अवस्थेत नागरिकांना दिसताच पोलिसांनी महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस येताच महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात करीत पुढील उपचार सुरु आहे. त्यांचा चांगल्या उपचारासाठी नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात हलविले आहे. पीडितेच्या सांगितल्यानुसार कारधा पोलिसांनी दोन संशयित आरोपीना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलिस करीत आहेत.