मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव पवार यांची कन्या आणि नाशिकमधील प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या महिला डॉक्टर प्राची पवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला झाल्याने संपूर्ण जिल्हा हादळला आहे. ही घटना मंगळवारी 13 डिसेंबर सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडली आहे.
नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन परिसरात डॉ. प्राची पवार आपल्या फार्म हाऊसवर इनोव्हा या चारचाकीने गेल्या होत्या. यावेळी फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारावर दुचाकी लावलेली त्यांना दिसली. दुचाकी बाजूला घ्या असं त्यांनी सांगितलं. परंतु याचा राग हल्लेखोरांना आल्याने अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्या तील एकाने चालकाच्या सीटवर बसलेल्या प्राची यांच्या हातावर दोन ते तीन ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले. डॉ. प्राची पवार यांनी तात्काळ गाडीच्या काचा लावताच टोळक्याने घटना स्थळावरुन पळ काढला.
यानंतर प्राची पवार यांनी कारच्या खाली उतरत जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे आजू बाजूच्या परिसरातील स्थानिक नागरिक मदतीला धावून आले आणि त्यांनी प्राची यांना नाशिक शहरातील पंडित कॉलनी परिसरातील त्यांच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली असून अतिरक्तस्राव झाल्याने त्या बऱ्याच काळ बेशुद्ध देखील होत्या.
हल्लेखोरांच्या शोध सुरु…
डॉ. प्राची पवार यांच्या वर प्राणघातक हल्लाचे वृत्त संपूर्ण शहरात प्रसरताच नातेवाईक, डॉक्टर्स आणि परिचित मंडळी रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या हल्ल्यामगील नक्की काय कारणआहे हे सिद्ध झाले नसून. आणि आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसून नाशिक ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. डॉक्टर महिलेसोबत असा प्रसंग ओढावल्याने वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

