पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ संभाजी गिरी, वय १९ वर्षे, रा. दुर्गा माता मंदिर एकता चौक खराडी पुणे यांस पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०१ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महीलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या आरोपीस अटक करुनही तो जामीनावर आल्यानंतर पुन्हा तशाच प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपीच्या कृत्यांमुळे महीलांमध्ये तसेच लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्हांचा अभिलेख तपासुन सदर इसमास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उप आयुक्त श्री शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास ०१ वर्षाकरीता पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त सो. श्री. नामदेव चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो. श्री. किशोर जाधव, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन पवार, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मारुती पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे…