सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 14 डिसेंबर रोजी दुपारी: 4.00 वाजता महिला सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला विषयक कायदे, हक्क अधिकार संबधी मार्गदर्शन करण्यात आले.
या महिला सुरक्षा समितीची सभेच्या अध्यक्षस्थानी बी.बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख वक्ता आर. बी. अलाम (शिक्षक), प्रमुख पाहुण्या सौ. मनीषा पप्पू महानंद (समिती सदस्य) आणि सौ. ममता नितेश हिकरे( पालक ) या होत्या. तसेच प्रमुख उपस्थिती सौ.एस एन लोधे मॅडम (समिती सचिव) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. यावेळी आर. बी. अलाम (प्रमुख वक्ता) यांनी सांगितले की, महिला सुरक्षा समिती महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची दखल घेऊन कारवाई करण्यास बाध्य करते. यासाठी शासनाने 1) महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, 2) महिला पोलीस कक्ष, 3) सामाजिक सुरक्षा विभाग, 4) विशेष समुपदेशन केंद्र, 5) बस स्थानक मदत केंद्र, 6) स्त्री भ्रूण हत्या, 7) 103 वर कॉल करणे, 8) शाळेत मदत पेटी, 9) विशेष गती न्यायालय, 10) हुंडाबळी तक्रार निवारण आदी सोयी महिलांच्या कल्याणासाठी उभारलेल्या आहे.
सौ. ममता नितेश हिकरे (पालक) यांनी सांगितले की, शिक्षकांना गुरु मानून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास धरून राष्ट्र प्रगतीत योगदान द्यावे आणि शाळा महिला संस्काराचे उत्तम केंद्र आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बी. बी. भगत सर (मुख्याध्यापक) यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, शासनाला महिला सुरक्षा समिती गठीत करण्याची आवश्यकता का भासली? कारण त्यांच्या हे लक्षात आले की, महिला असुरक्षित आहे. एखाद्या शाळेत याबाबत तक्रार झाल्यास, ती त्या ठिकाणीच सोडवली गेली पाहिजे.
शाळेमध्ये झालेल्या तक्रारीचे निराकरण शाळा व्यवस्थापन समिती करते. तक्रार जोपर्यंत केल्या जात नाही, तोपर्यंत समोरच्या व्यक्तीची हिंमत वाढते आणि उशीर होतो आहे, मग त्याचे परिणाम समाजामध्ये दिसून राहिले आहे. खास करून विद्यार्थिनींनी शाळेत येताना जाताना त्यांना असुरक्षित वाटत असल्यास महिला शिक्षिकेला सांगावे म्हणजे तक्रारीचे निराकरण करण्यास सोपे जाणार.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस.एन. लोधे मॅडम (समिती सचिव) आणि आभार प्रदर्शन एस. एम चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिनेश भाले बाबू, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, सुरेश मोरे, इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते. शेवटी चॉकलेट वाटप करण्यात आले.
न्यूज एकदम चांगली आहे. Please visit my website https://www.ballarpurvarta.com/