Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पोलिस उपनिरीक्षक सापडला जाळ्यात; 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं, वर्धा पोलिसांत खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 15, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पोलिस उपनिरीक्षक सापडला जाळ्यात; 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं, वर्धा पोलिसांत खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विवेक जानराव लोणकर याला 2 लाखांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आरती चौकात असलेल्या नर्सरीच्या प्रवेशद्वारा समोर केली.

आरोपीची बेल रद्द न होण्याकरता तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीला आरोपी न करण्याकरिता तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल :
वर्ध्याच्या हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक फसवणुकीचा गुन्हा होता. फसवणुकीची रक्कम 44 लाखांवर असल्याने हे प्रकरण हिंगणघाट पोलिस ठाण्यातून पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक विवेक लोणकर यांच्याकडे होता.
याप्रकरणात अकोला येथील रहिवासी असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर झाला होता. तक्रारदार तारखेवर हजरही राहत होता. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेतील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक लोणकर याने फसवणूकीतील आरोपीला दाखल गुन्ह्यात त्याच्या पत्नीला आरोपी न बनविण्यासाठी तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी तसेच जामीन रद्द न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यावर सातत्याने लोणकरकडून मानसिक दबाव निर्माण केला जात होता.

सापळा रचून केली कारवाई
तक्रारदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून पोलिस अधीक्षक राहुल माखणीकर यांच्याकडे तक्रार केली. तक्रार दाखल होताच सापळा रचून प्रकरणी पहाटेच नागपुर येथील लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्जापुरे यांचे पथक वर्ध्यात दाखल झाले. आरती चौकातील नर्सरी समोर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपी विवेक लोणकर याला फोन करुन बोलाविले. आरोपी लोणकर हा दुचाकीने नर्सरीच्या प्रवेशद्वाराजवळ आला. तेथून त्याने झाडेही विकत घेतली. तेवढ्यातच तक्रारदाराकडून लोणकरने दोन लाख रुपये घेत दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असतानाच त्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. या कारवाईत पोलिसांनी लोणकर यांची दुचाकीही जप्त केली आहे.

Previous Post

गजानन नगर प्रभात क्र.३ मध्ये घाणिचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष, साफसफाई अभावी नाल्यांचे पाणी रस्त्यावर.

Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयात आशा स्वयंसेविकेसाठी ‘आशा घर’ उशीर झाल्यास आशां स्वयंसेविकाना करता येणार मुक्काम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जिल्हा सामान्य रुग्णालयात आशा स्वयंसेविकेसाठी ‘आशा घर’ उशीर झाल्यास आशां स्वयंसेविकाना करता येणार मुक्काम.

जिल्हा सामान्य रुग्णालयात आशा स्वयंसेविकेसाठी ‘आशा घर’ उशीर झाल्यास आशां स्वयंसेविकाना करता येणार मुक्काम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In