अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला वाहतूक पोलीस कर्मचारी नेहमीच आपल्या कामात कर्तव्य दक्ष असुन चोरीचे वाहन शोधुन काढतात व त्या मालकाच्या स्वाधीन करतात अश्या कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चिकटे यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, ॲड.रोशन तायडे, विशाल भोसले यांनी सत्कार केला.
वाहतूक नियंत्रणाचे काम करणाऱ्या अमंलदार वाहनधारकांना नियमाच्या चौकटीत राहून वाहन चालविण्यास दंड करतात त्यासाठी त्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. या सतर्कतेमुळे शहर वाहतूक शाखा अकोला येथे कार्यरत अमलंदार दिलीप हिंगणकर, ज्ञानेश्वर चिकटे, सचिन दवंडे यांनी वाहनाची चोरी उघडली. सांगली गजबजलेल्या गांधी रोडवरील चांदेकर चौकात कार्यरत असताना दुचाकी एम एच ३० एव्ही 4137 बाबत संशय आला त्यांनी वाहन थांबवून विचारपूस केली असता, वाहनाचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता वाहन चालक जवळ कोणत्याही प्रकारचे आवश्यक कागदपत्र नसल्याचे निदर्शनास आले. वाहन चालकास विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उडवा उडविची उत्तर दिली. कागदपत्र आणून दाखवतो असे म्हणून वाहन चालक तशीच दुचाकी सोडून निघून गेला परंतु वाहन चालक दुचाकी घेण्यास परत आला नाही वाहन चालक परत न आल्याने पोलीस अमंलदार यांनी गाडी शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला येथे आणून डिटेन केली.
आता दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध लावला ही दुचाकी डॉ.प्रमोद राहुडकर रा. अमानवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांची असल्याबाबत समजले दुचाकीच्या मूळ मालकास मोबाईल वरून संपर्क करून माहिती विचारली असता त्यांनी सदरची दुचाकी त्यांच्या मालकीची असून सन 2016 मध्ये बार्शीटाकडी बायपास इथून चोरीस गेल्याबाबत कळविले दुचाकी चोरी गेल्या बाबत त्यांनी बार्शीटाकली पोलीस स्टेशनला देखील नोंद केली असल्याबाबत कळविले त्यामुळे सर्व सोपस्कार पार पाडून गाडी बार्शीटाकळी पोलीस यांच्या ताब्यात दिली व गाडी मालकाला परत करण्यात आली. आतापर्यंत ज्ञानेश्वर चिकटे या वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी एकूण सात दुचाकी मूळ मालकास परत केल्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन शेळके व आताचे विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहतूक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.
त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे एड. रोशन तायडे सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले यांनी नेहरू पार्क चौक स्थित कार्यरत असलेले ज्ञानेश्वर चिकटे या वाहतूक पोलिसांचा सत्कार केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348