पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे:- कोढवा पोलीस ठाणे पुणे गुरन.१२०३/२०२२.भा.द.वि. कलम ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे दाखल गुन्हयातील फिर्यादी है पानटपरी चालक असुन त्याची पानटपरी एनआयबीएम रोड येथे आहे. दिनांक ०४/१२/२०२२ रोजी एनआयबीएम रोड कॅफे इंडिया हॉटेलजवळ सुरज अपार्टमेंटच्या बाजुला लोणकर वस्ती कोंढवा पुणे येथे सदर पानटपरी चालक यांच्यावर पाव इसमाने कोयत्याने चार करून त्याच्या गल्ल्यातील ३५००/- रु. रोख रक्कम दरोडा टाकुन चोरी केली होती. सदर गुन्हा आरोपी यांनी ओळखु न येण्यासाठी सोडाला रुमाल जर्किंग चालुन गुन्हा गेला. होता. दाखल गुन्हयातील आरोपी यांचा सीसीटिव्हि तसेच गुप्त बातमीदारामार्फतीने आम्ही स्वतः व स्टाप असे शोध घेत होतो नमुद गुन्हा हा १) रमजान पटेल २) ईस्माईल शेरीकर ३) हर्षल पवार सर्व राहणार शिवनेरीनगर अॅडल बेकरी जवळ, लेन नंबर २३ गणराज टॉवर यांनी केला असल्याची खात्रीशिर माहिती पोलीस अंमलदार सुहास मोरे, जयदेव भोसले यांना प्राप्त झाली होती.
सदर आरोपी यांचा वरिल स्टाफच्या मदतीने शोध घेत असताना वरिल तीनही इसम है साईबाबा मंदिर येथे थांबले असल्याची माहिती मिळाली असता आरोपी यांना वरिल स्टाफच्या मदतीने साईबाबा मंदिर शिवनेरीनगर येथुन सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) रमजान अब्बास पटेल, वय १९ वर्षे ७ महिने, रा. शिवनेरीनगर अॅडल वेकरी जवळ, लेन नंबर २३ गणराज टॉवर कोंढया पुणे. १२) ईस्माईल मैनुद्दीन शेरीकर, वय २० वर्षे, रा. भाग्योदयनगर, गल्ली नं. २६, सना बेकरी जवळ, कोंढवा खुा पुणे. ३) हर्षल आनंद पवार, वय १८ वर्षे ५ महिने, रा. शिवनेरीनगर, गल्ली नं.३६, साईबाबा मंदिर जवळ, कोंढवा खु पुणे असे सांगितले. आरोपी यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणे आणुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली करून त्याचे गुन्हा करताना नमुद गुन्हयात आरोपी यांना अटक करुन त्यांच्याकडुन गुन्हयात वापरेला कोयता, मोटार सायकल व पोरी केलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपी पैकी ईस्माईल मैनुद्दीन शेरीकर यांच्या विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे एकुण ५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १ खुन. १ दरोडा ३ खुनाचे प्रयत्न असे वारंवार गुन्हे करित असल्याने ईस्माईल शेरीकर यास १ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त मा. विक्रांत देशमुख मा. सहा पोलीस आयुक्त श्रीमती पोर्णिमा सावरे, ना.परिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय गोगले यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, सुहारा मोरे, जयदेव भोसले, गणेश चिंचकर, दया मरगळे, अभिजीत रत्नपारखी राहुल रासने, महेश राठोड, दिपक जडे यांनी केला आहे.

