देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- संत गाडगेबाबा हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव हिंगणा तालुक्यात उपक्रमशील शाळा म्हणून उदयास आलेली बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित संत गाडगेबाबा हायस्कूल व ओंकार पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.उल्हास मोगलेवार होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक नरेंद्र कुकडे, संत गाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रेमास उरकुडकर व ओंकार पब्लिक स्कूलच्या सोनाली कोहाड हे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून झाली. विद्यार्थिनी कोमल तायडे, सना पठाण, रितिका ठाकूर, स्नेहा पटले यांनी याकार्यक्रमात सुंदर स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमदास उरकुडकर यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती व स्नेहभाव असावा असे भर देऊन सांगितले. नरेंद्र कुकडे यांनी विद्यार्थी म्हणजे काय व विद्यार्थ्यांचे गुण विशेष समजून सांगितले. विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्षांनी वैज्ञानिक थॉमस एडिसन यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे संचालन वाढीभस्मे यांनी व आभार प्रदर्शन मनोज नेहारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशासाठी निलेश ठाणेकर, मीनाक्षी मते, मनीषा वाढीभस्मे व महेंद्रजी ठाणेकर, रविंद्र बोबडे, ज्ञानेश्वर पवार, विजय इंगोले यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षांनी प्रत्यक्ष क्रिकेट खेळून मैदानात केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

