पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट -०५, पुणे शहर
पुणे :- फिर्यादी यांचा मुलगा गणेश मुळे वय २१ वर्षे यास त्याचे मित्र यांनी जेवणासाठी घेवुन जावुन त्याचा अज्ञात कारणासाठी बंदुकीतून गोळी झाडुन खुन केला आहे व पुरावा नष्ट करणेसाठी त्याची बॉडी हि बोपदेव घाटामध्ये फेकुन दिली आहे म्हणुन हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७१ / २०२२ भा.द.वि. कलम ३०२, २०१,३४ आर्म अॅक्ट ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदरबाबत गुन्हे शाखा युनिट-५ कडील पोलीस अधिकारी व स्टाफ घटनास्थळी भेट देऊन युनिटकडील पोलीस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे युनिट-०५, गुन्हे शाखेकडील स्टाफ यांनी तातडीने आचार्य अत्रे गार्डन समोर नारायणपुर रोडवर. सासवड, पुणे येथून १) रोहन राजेंद्र गायकवाड वय २३ वर्षे, रा. स.नं. १३, कॉलणी नंबर २, लाईट बिल भरणा केंद्राजवळ, सातववाडी, हडपसर पुणे २) अक्षय संदिप गंगावणे, वय २१ वर्षे, रा. स.नं. १३ कॉलणी नंबर १, अजिक्य शाळेजवळ, सातववाडी, हडपसर, पुणे ३) चेतन परमेश्वर कुदळे, वय २४ रा. स.नं. १३, बनकर कॉलणी, हडपसर, पुणे ४) योगेश सुभाष भिलारे, वय २४ वर्षे रा. स.नं. १३, कॉलणी नं. १, सातववाडी, हडपसर, पुणे यांना इको गाडीसह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडे तपास करता त्यांनी मयत गणेश मुळे यास मारल्यानंतर गणेशची करिझ्मा गाडी घेवुन शिंदवणे घाटात सोडुन मयत बॉडी बोपदेव घाटात बोपदेव मंदिराजवळ टाकुन देवुन त्यानंतर पिस्टल देहूगावात नदीत फेकुन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी यांना हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देणेत आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त.. श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक, चैताली गपाट, पोलीस अंमलदार, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, रमेश साबळे, विनोद शिवले, राहुल ढमढेरे, अकबर शेख, अमित कांबळे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे…

