पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर
पुणे :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना फुरसुंगी ते उरुळी देवाची पर्यंत एकूण १ कि.मी. ची पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम चालु असून, त्यासाठी लागणारे लोखंडी महागडे पाईप साईटवर ठेवलेले असताना त्यातील ०३ टन वजनाचे ०२ लोखंडी पाईप चोरुन नेऊन विक्री केले बाबतची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंगलदार हे हदीत पेट्रोलिंग करित असताना, पो.ना. नितीन मुंढे यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळाली की,
सदर गुन्हा हा विकास सकट रा. लोहियानगर पुणे, याने केलेला असून त्याने अंगात पिवळे रंगाचा
फुलबाहीचा शर्ट व काळी पॅन्ट घातलेली आहे. तो हांडेवाडी रोडवर येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर बाबत श्री रजनीश निर्मल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांना कळविले असता त्यांनी आरोपीचा शोध घेऊन कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले.
युनिट ६ कडील स्टाफने हांडेवाडी रोडवर जाऊन सापळा रचून आरोपींची टेहळणी करत असताना होंडेवाडी रोडवर गिळालेल्या बातमीतील इसग पायी चालत येत असल्याची खात्री झाल्याने त्यास हटकले असता तो पळून जाण्याचे प्रयत्नात असताना त्यास स्टाफचे मदतीने जागीच ताब्यात घेण्यात आले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विकास जालींदर सकट वय ३८ वर्षे रा. ५४ एच पी घर क्र. २०० लोहियानगर पुणे. मुळगाव मु. पो. अलीपुर ता. बार्शी जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे नमूद गुन्हयाबाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट ६ कार्यालय वाघोली पुणे येथे आणून नमूद गुन्हयाचे बाबत तपास करता प्राथमिक तपासात त्याने सदरचा दाखल गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याचे कबुली दिल्याने सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट ६ ने करुन, नमुद गुन्ह्यात वर नमुद आरोपीस अटक करुन, मा. न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेवुन रिमांड मुदतीत त्याचेकडे अधिक तपास करताना त्याने चोरी केलेला माल त्याचे साथीदारच्या मदतीने भंगारवाला दुकानदार नामे परविंद कुशेबा कांबळे रा. मगर फार्म वडकी, पुणे प्यास विकल्याचे सांगितले. नमुद गुन्हयात भंगारवाला दुकानदार परविंद कुशेवा कांबळे वय ३८ वर्षे रा. मगर फार्म वडकी, पुणे यास अटक करुन त्याचे गोडावून मधुन १.५ टन वजनाचा १५,००००/- रुपये किंमतीचा लोखंडी पाईप व विक्रीसाठी २९ तुकडे केलेले १.५ टन वजनाचे १५००००/- रु.कि.चे लोखंडी पाईप जप्त केले. तसेच सदर माल चोरी करण्यासाठी वापर करण्यात आलेला २०,००,०००/- रुपये किंमतीचा आयशर ट्रक व ४२,००,०००/- रु. कि वे क्रेन जपा करण्यात आले आहे. असा एकुण ६५,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी क्र. १) विकास जालींदर सकट वय ३८ वर्षे रा. ५४ एच पी घर क्र. २०० लोहियानगर पुणे. मुळगाव मु.पो. अलीपुर ता. बार्शी जिल्हा सोलापूर २) परविंद कुशेवा कांबळे वय ३८ वर्षे रा. मगर फार्म वडकी, पुणे यांना अटक केली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास युनिट ६ मार्फत चालु आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह- आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रजनिश निर्मल, पोउनि सुरेश जायभाय, पोउनि भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विकुल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन घाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.