✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
हिंगणघाट:- स्पर्धेच्या युगात मराठी शाळा टिकवताना नवनविन प्रयोग करणे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकाना आवश्यक आहे. शिक्षणाचा स्तर रोज बदलतो आहे. शिक्षण बदलत्या स्थितीत आपल्याला स्विकाराव लागेल. नाविन्य पूर्ण प्रयोग करुन मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्थित्व टिकवावं लागेल. आज मोठया प्रमाणात सीबीएससी, इंटरनॅशलन स्कूल यांच्या स्पर्धेत टिकायच असेल तर संस्था, शिक्षक व पालक यांना अधिक तयारी करावी लागेल. हा अम़ृत काळ आहे आपण शताब्दी कडे वाटचाल करीत आहोत आपण वर्तमान स्वत: अनुभवत आहोत आपला भूतकाळही गौरवशाली होता व येणारा भविष्य काळ शताब्दीचा काळ सुध्दा उज्ज्वलच असणार आहे. वर्धा जिल्हयातच नव्हे तर विदर्भाच्या शिक्षण क्षेत्रात आपल्या शाळेचे स्थान निर्माण व्हायला हव असे विचार विधान परिषदचे आमदार डॉ. रामदासजी आबंटकर यानी व्यक्त केले.
ते प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी, हिंगणघाट व भारत विद्यालय, हिंगणघाट यांच्या अमृत महोत्सव निमित्य भव्यसंयुक्तिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी,हिंगणघाट चे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिन जगताप , शिक्षणाशिकारी माध्य. वर्धा, श्रीकांत देशपांडे , अभिलेखागार व सदभावना मंच विदर्भ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी, हिंगणघाटचे उपाध्यक्ष श्यामभाउ भिमणवार, संस्थेचे सचिव रमेशराव धारकर, संचालक सजंयराव देशपांडे, स्नेह सम्मेलनांचे प्रमुख् तथा भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, तसेच सर्वशाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी सचिन जगताप म्हणाले या वर्षात आपण भारतीय स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव साजरा करित असतानाच आपल्या संस्थेंचा व विद्यालयाचा अमृत महोत्सव साजरा करित आहोत हा सुर्वळ काळ आहे. संस्थेंचा व शाळेचा हा वटवृक्ष यापुढेही ज्ञानदानाचे असेच काम करित राहील अशा विश्वास केला. विद्यार्थ्याने ज्ञानाचे महत्व जाणावे. विद्यार्थ्यानी अवांतर वाचन करूण अन्य क्षेत्रातील ज्ञान संपादन करावे. समाजाच्या व विद्यार्थ्याच्या प्रगती साठी चालणारी ही संस्था व शाळा प्रगती करित भारत मातेचे मजबूत स्थंभ तयार करित राहील यांत शंका नसल्याचे मत त्यानी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीकांतजी देशपांडे यानी सुध्दा आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की देशाचा ,संस्थेंचा व शाळेचा अमृत महोंत्सव साजरा करण्याचा योग आला यांचा अभिमान आहे. आपण स्वातंत्रयात जन्माला आलो हे भाग्य पंरतू यासाठी आपल्या पूर्वजानी अथक परीश्रम घेतले यांचे भान असु दयावे. संस्थेच्या व शाळेच्या माध्यमातून समाज घडत आहे.तेव्हा आपण ही या देशाला काही देणे लागतो असा भाव निर्माण झाला पाहिजे. या स्नेह सम्मेलनातून देशासाठी देण्याची प्रवृती बाळगावी अंगीकारावी हीच अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव रमेशराव धारकर यानी सुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी स्नेह सम्मेलन काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बळीराम चव्हाण यानी केले. तर आभार प्रर्दशन मुख्याध्यापक चंद्रशेखर खडतकर यानी तथा सुत्रसंचालन हर्षल बुलदेव व दत्ता भांगे यानी केले. संस्थे अंतर्गत चालणा-या शाळेतील 5000 हजार विद्यार्थ्याच्या भोजनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348