गोंडवाणा विद्यापिठाचा भोंगळ कारभार वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन केली क्रिडा व्यवस्थापकाशी चर्चा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आंतर महालिद्यायीन बॉक्सींग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करून ऑल इंडिया बॉक्सींग स्पर्धेकरीता निवड झालेल्या मुलींची गैरसोय थांबवून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाने गोंडवाणा विद्यापिठातील क्रिडा व्यवस्थापक विष्णूकुमार चौधरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळात वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या मालाताई भजगवळी, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, महासचिव सोनलदिप देवतळे, संगठक भारत रायपूरे, दुधराम महागानकार आदिंचा समावेश होता.
आंतरमहाविद्यालयीन बॉक्सींग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविलेल्या गोंडवाणा विद्यापिठ गडचिरोली येथिल दहा मुलींची निवड हरियाणा राज्यात २६ डिसेंबर २०२२ पासून सुरू होत असलेल्या ऑल इंडिया बॉक्सिंग स्पर्धेकरीता यशश्री साखरे, पोर्णिमा सरकटे कल्याणी महागानकार, पुणम बन, उज्वला हरणे हेमंती बुजाडे, प्रिती कुटे, भूमिका नंदवंशी, प्रिती नाईक , स्वाती हनवंते या दहा मुलिंची निवड झाली असतांना सुध्दा संबंधित अधिका-यांनी रेल्वेचे आरंक्षण आजपर्यंत केलेले नाही, तसेच कोच व ट्रॅक सुट सुध्दा उपलब्ध करून न दिल्यामूळे बॉक्सर स्पर्धेपासून वंचित राहण्याची वेळ दहा मुलींवर आली होती परंतु वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांनी क्रिडा व्यवस्थापकाची भेट घेऊन सर्व अडचणी दूर करून तात्काळ सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या व गैरसोय करणा-या बेजबाबदार संबंधित अधिका-यांवर कुलगूरू प्रशांत बोखारे यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी क्रिडा व्यवस्थापकांनी सर्व सूविधा तात्काळ उपलब्ध करून देऊन त्यांना हरियाणातील रोहतक येथे होत असलेल्या ऑल इंडिया बॉक्सिंग स्पर्धेकरीता उद्या रवाना करू असे आश्वासन दिल्यामूळे बॉक्सिंग खेळाडू मुलिंचा जीव भांड्यात पडला.