मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री साई प्रतिष्ठान नंदोरी रोड हिंगणघाट द्वारा आयोजित श्री संत साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिन तसेच राजयोगी श्री संत लक्ष्मी माताजी यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२२ दरम्यान दुपारी ०२ ते ०६ या वेळात श्री राम कथेचे आयोजन श्री साई मंदिर नंदोरी रोड हिंगणघाट येथे केले आहे.
या श्री राम कथा भागवत्ताचार्य ह.भ.प.श्री शिवाजी महाराज वटंबे आळंदी आपल्या मधुर वाणीतून कथा सादर करणार आहे. दि.२२ डिसेंबर २०२२ ला श्री संदीप पाल गीते महाराज यांच्या सप्तखंजेरी वादनाचा मनोरंज व प्रबोधनात्मक कार्यक्रम साय ०६ ते ०९ या वेळात होणार आहे. दि.२७ डिसेंबर २०२२ ला भव्य महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे. तरी हिंगणघाट शहरातील भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी श्री साई प्रतिष्ठान च्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

