पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शह
पुणे :- दि.१९ / १२ / २०२२ रोजी सिंहगड रोड, माणीकबाग, पुणे येथील स्वीट मार्टचे मालक हे दुकानात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना “फुकट काजुकतली दे, फुकट काजू कतली दिली नाहीतर तुला गोळया घालीन” अशी धमकी दिली. दुकान मालकाने काजुकतली फुकट देणेस नकार दिला असता, निळे रंगाची डार्क जिन पेन्ट व रंगबिरंगी शर्ट घातलेला व डोक्यावर काळे रंगाची उलटी टोपी घातलेल्या आरोपीने त्याचेकडील पिस्तुल काढुन “फुकट काजू कतली दे नाहीतर गोळीच घालतो” असे म्हणुन दुकान मालकाचे दिशेने रोखून २ ते ३ वेळा फायरिंग करणेकरीता पिस्तुलचा ट्रेंगर दाबला असता, पिस्तुल मधुन एकही गोळी फायर झाली नाही. त्यानंतर आरोपी हा दुकानातुन बाहेर निघुन जावुन, पुन्हा दुकानामध्ये येवुन “फुकट काजू कतली दे पैसे मिळणार नाही ” असे म्हणुन फिर्यादीचे दिशेने पिस्तुल रोखुन फायरींग करण्याचा प्रयत्न केला असता, पिस्तुल मधुन एकही गोळी फायर न होता, पिस्तुल मधुन एक राऊंड खाली पडला. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलीस ठाणे गु. रजि.नं. ५३९ / २०२२ भादविक ३०७, ३८७,३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), आर्म अॅकट कलम ३७ (१) १३५ •अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपासा मध्ये पोलीस उप निरिक्षक, स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार, अमित बोडरे, शिवाजी क्षिरसागर, सागर शेडगे यांनी त्यांना मिळालेल्या बातमीदारा करवी ०८ तासांमध्ये वरील गुन्हयातील आरोपी यांना निष्पन करून सदर आरोपींचा शोध घेऊन, आरोपी सुरज ब्रम्हदेव मुंढे, वय २३ वर्ष, रा. घर नं. २ / ४४, माणीकबाग, सिंहगड रोड, पुणे यास दिनांक २०/१२ /२०२२ रोजी अटक करण्यात आली असुन एक विधीसंषर्धीत बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप- आयुक्त, श्री. परि-३, मा.सहा. पोलीस आयुक्त श्री. सुनिल पवार, सिंहगड रोड विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), जयंत राजुरकर, पोलीस उप निरिक्षक, स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार, अमित बोडरे, शिवाजी क्षिरसागर, सागर शेडगे, संजय शिंदे, विकास बांदल, राजु वेगरे, सुनिल चिखले, गौतम किरतकुडवे व गणेश झगडे यांनी केली आहे.

