हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर गावामध्ये बरेच वर्ष झालेले आहे आमसभा घेण्यात आली नाही. कितीतरी लोक आहे की त्यांच्या मनात शासनासमोर आपले प्रश्न मांडायची इच्छा आहे तरी पण ते आपल्या हक्कासाठी बरेच वर्ष होऊन गेले बोलू शकले नाही. त्यासाठी आपण निवेदन मार्फत येणाऱ्या 15 ऑगस्ट ला आम सभा वडनेर गावामध्ये गावाच्यामध्ये घेण्यात यावी यासाठी वडनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी हिंगणघाट उपविभागीय अधिकारी श्रीमती सोनुले, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
निदेनात, आमच्या वडनेर गावांमध्ये बरेच वर्षापासून आमसभा घेण्यात आली नाही, त्यामुळे गावातील नागरिक येणाऱ्या 15 ऑगस्ट 2022 ला आम सभेचे आयोजन व्हायला हवे जेणेकरून नागरिकांचे बरेच वर्षानुवर्ष रखडलेलं अगणित प्रश्न मार्गी लागावे, व त्यांना त्यांचे प्रश्न समोर ठेवता यावे करिता नागरिकानमार्फत ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तरी या विषयाकडे गांभीयाने लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर आमसभेचे आयोजन गावाच्या मधोमध करण्यात यावे ही अशी मागणी गावकरी व गुरुदयालसिंघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर मागणी केलेली आहे. गोरगरीब जनता स्वतःसाठी कितीतरी वर्षे झाले त्यांनी आपल्या हक्कासाठी केव्हाही ग्रामपंचायत कोणतेही आमसभा न घेता वर्षात वर्ष निघून गेले त्यांना पण संधी मिळावी आपल्या हक्कासाठी बोलण्याकरिता गावातल्या प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे वर्षातून तीन ते चार आमसभा मध्ये त्यांच्या हक्क शासनाने द्यावी ही निवेदन मार्फत गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर व प्रशांत दरोडे सामाजिक कार्यकर्ते निवेदन देण्यात आले.